शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

वाहक गोपाळ पाटील यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:59 IST

देशभक्तीपर गितांची स्पर्धा उत्साहात जळगाव : शिवाजीनगरात शाैर्य महिला बचत गट, गणेश क्रीडा संस्था व दत्तगुरू संस्थेतर्फे महिलासांठी हळदी ...

देशभक्तीपर गितांची स्पर्धा उत्साहात

जळगाव : शिवाजीनगरात शाैर्य महिला बचत गट, गणेश क्रीडा संस्था व दत्तगुरू संस्थेतर्फे महिलासांठी हळदी कुंकू व लहान मुलांसाठी देशभक्तीपर गितांच्या स्पर्धा उत्साहात पार पडल्या. यावेळी महापौर भारती सोनवणे, रंजना सपकाळे व उज्वला बाविस्कर यांच्याहस्ते विजेत्यांना बक्षिस देऊन गौरविण्यात आले. ज्योत्स्ना दारकुंडे यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते.

विनातिकीट प्रवाशांकडून ९८ हजारांचा दंड वसुल

जळगाव : भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे नुकत्याच विनातिकीट प्रवाशांविरोधात राबविलेल्या मोहिमेत विनातिकीट १६८ प्रवाशांकडून ९८ हजार ६५ रुपये दंड वसुल केला आहे. सिनिअर डीसीएम युवराज पाटील यांच्या सुचनेनुसार १६ तिकीट निरीक्षकांनी ही कारवाई केली. या कारवाईमुळे विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे दाबे चांगलेच दणदणाणले आहे.

भुसावळ विभागातून ३८ कर्मचारी सेवानिवृत्त

जळगाव : भुसावळ रेल्वे विभागातून विविध विभागातील ३८ कर्मचारी नुकतेच सेवा निवृत्त झाले आहेत. सेवानिवृत्ती निमित्त डीआरएम विवेककुमार गुप्ता, एडीआरएम मनोज कुमार सिन्हा, वरिष्ठ कार्मिक अधिकारी एन. डी. गांगुर्डे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच या कर्मचाऱ्यांचा स्थानिक स्टेशन प्रशासनातर्फेही सत्कार करण्यात आला.

पॅसेंजर सुरू करण्याची मागणी

जळगाव : मुंबईत सर्व सामान्य प्रवाशासांठी लोकल सेवा सुरू करण्यात येत असल्याने, शासनाने आता भुसावळ विभागातील पॅसेंजरही सुरू कराव्यात, अशी मागणी प्रवाशांमधुन होत आहे. पॅसेंजर बंद असल्यामुळे चाकर मानी प्रवाशांची सर्वांधिक हाल होत असून, खाजगी वाहतूकीने जादा पैसे मोजून प्रवास करावा लागत आहे.

किरण ठाकूर यांची निवड

जळगाव : छावा मराठा युवा महासंघ विद्यार्थी आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी किरण ठाकूर यांची निवड करण्यात आली आहे. तसेच कार्यकारणी सदस्यपदी प्रांजल नेमाडे व सागर मोतीराळे यांची निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे यांनी त्यांची निवड केली.

पथदिवे लावण्याची मागणी

जळगाव : सुप्रीम कॉलनीतील प्रभाग क्रमांक १९ मध्ये पथदिवे नसल्यामुळे रात्रीच्या वेळी नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तरी प्रशासनाला तातडीने पथदिवे लावण्याबाबत आदेश देण्यात यावेत, अशी मागणी प्रभाग समिती सदस्य विठ्ठल पाटील यांनी महापौर भारती सोनवणे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

विनोद प्रजापत यांची निवड

जळगाव : लहुजी बिग्रेड संस्थापक सुरेश अंभोरे यांनी गायक कलावंत सेलच्या प्रदेशध्यक्षपदी विनोद प्रजापत तर सरचिटणीस पदी दिपा तापडीया यांची निवड केली आहे. यावेळी अल्पसंख्याक सेलचे प्रदेश अध्यक्ष शेरखान, शाम जगताप, द्धारकादास सोनी, सलीम शेख, सतीश बाटुंगे, सागर वायकोळे, संजय अंभोरे, दर्शन तापडीया आदी मान्यवर उपस्थित होते.

अलफैज उर्दु हायस्कुलमध्ये वृक्षारोपण

जळगाव : अलफैज उर्दु हायस्कुलमध्ये शाळेचे चेअरमन मुश्ताक सालार यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक पठाण आसिफ खान, शेख तौफिक, शेख नबाब, जाहिद खान, शेख वकार, शेख आवेस आदी शिक्षकवृंद उपस्थित होते.