शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

10 लाखाचे दागिने घेऊन कारागिरांचा पोबारा

By admin | Updated: March 23, 2017 00:18 IST

धक्कादायक : दागिने बनविण्यासाठी दिले 350 ग्रॅमचे सोन्याचे बिस्कीट;चौकशीसाठी गेलेल्या सराफालाच धमक्या

जळगाव : दागिने बनविण्यासाठी दिलेले दहा लाख रुपये किमतीचे 350 ग्रॅम सोन्याचे बिस्किट घेऊन बंगाली कारागिरांनी पोबारा केल्याची धक्कादायक घटना शहरात घडली आहे. महिनाभरापूर्वी घडलेल्या या घटनेची सराफाने रामानंद नगर पोलिसांकडे तक्रार केली आहे. दरम्यान, या कारागिरांच्या गावात चौकशीसाठी गेलेल्या सराफ व मध्यस्थीला त्यांच्या नातेवाईकांनी धमकी देऊन पिटाळून लावले आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी की, सचिन वसंतराव भामरे यांचे पिंप्राळा येथील सोमाणी व्यापारी संकुलात साई ज्वेलर्स नावाने दुकान आहे. भामरे हे सोने, चांदी घडविण्याचे तसेच खरेदी-विक्रीचे काम करतात. ऑर्डरप्रमाणे दागिने घडविण्याचेही काम करतात. सुशांता सुनील कुंडू (रा.चुनाबाटी, ता.शिवपुर, जि.हावडा, पश्चिम बंगला) व राकेश अनंत अधिकारी (रा.धुलेकुंडू जि.हुगळी, पश्चिम बंगाल) दोन्ही.ह.मु.सीताराम प्लाझा, मारोती पेठ, जगताप मंगल कार्यालयासमोर जळगाव या दागिने घडविणा:या कारागिरांशी भामरे यांची 9 वर्षापासून ओळख होती. त्यातून त्यांच्याशी व्यावसायिक संबंध प्रस्थापित झाले होते. 22 फेब्रुवारी रोजी भामरे यांच्याकडे दागिने घडविण्याची ऑर्डर आली. त्यांनी राकेश व सुशांता या दोघांना त्यादिवशी दुकानात बोलावून घेतले व ईअर रिंग 3 ग्रॅम 53 जोडी, मंगळसूत्र पोत पेंडलसह 35 ग्रॅमप्रमाणे 2 नग व मंगळसूत्र वाटी 2 ग्रॅम जोडी प्रमाणे 60 नग अशी ऑर्डर दिली. त्यासाठी 350 ग्रॅमचे सोन्याचे बिस्कीट या दोघांच्या ताब्यात दिले होते. बिस्कीट मिळताच ठोकली धूमसोन्याचे बिस्कीट मिळताच सुशांता व राकेश या दोघांनी जळगावातून धूम ठोकली. ऑर्डर घेताना या दोघांनी भामरे यांना 4 ते 5 दिवसात सोने बनवून देतो असे सांगितले होते, त्यानुसार भामरे यांनी त्यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला असता दोघांचा मोबाईल बंद येत होता. त्यामुळे ते राहत असलेल्या ठिकाणी गेले, मात्र तेथील सहका:यांनी हे दोन्हीजण कोणालाच काहीही न सांगता बाहेरगावी निघून गेल्याचे समजले. पोलिसांकडे कथन केली घटनापश्चिम बंगालमधून परत आल्यानंतर सचिन भामरे यांनी रामानंद नगर पोलीस स्टेशनला जाऊन संपूर्ण घटना कथन केली. दरम्यान, भामरे यांनी पोलिसांकडे लेखी तक्रार केली आहे. उपअधीक्षक सचिन सांगळे यांच्याशीही समाजातील काही लोकांनी या विषयावर चर्चा केली. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.