पाचोरा येथे दोन ठिकाणी घरफोडी

By Admin | Updated: May 29, 2017 13:32 IST2017-05-29T13:32:16+5:302017-05-29T13:32:16+5:30

रविवारी मध्यरात्री तलाठी कॉलनीतीलशुभम सौंदणे आणि कैलास पाटील यांचेकडे घरफोडी झाली.

Burglar at two places in Pachora | पाचोरा येथे दोन ठिकाणी घरफोडी

पाचोरा येथे दोन ठिकाणी घरफोडी

ऑनलाईन लोकमत

पाचोरा,दि.29 - शहरात रविवारी मध्यरात्री तलाठी कॉलनीतीलशुभम सौंदणे आणि  कैलास पाटील यांचेकडे घरफोडी झाली. कडीकोंडे कटरने कापून ही चोरी करण्यात आला. याचबरोबर भगवान खरे हे गावी गेले असल्याने त्यांच्या घराचे दार तोडण्याचा प्रय} झाला. कैलास पाटील  यांचे कडे सुमारे दहा हजार रुपये केले लंपास तर शुभम सैंदाणे यांचेकडेही 7 हजाराची रोकड केली लंपास झाली. घरमालक छतावर झोपलेले असतांना चोरटय़ांनी संधी साधली. नागरिकांनी प्रत्यक्ष चार अनोळखी लोकांना या परिसरात बघितले होते. पोलीस गस्त घालत नसल्याची नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया या निमित्ताने उमटली.

Web Title: Burglar at two places in Pachora