शेतीच्या बांधावरून भाऊबंदकी उफाळली; सहा जखमी, १८ जणांवर दंगलीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:18 IST2021-09-27T04:18:17+5:302021-09-27T04:18:17+5:30

वाघरे गावातील भाऊसाहेब भिकारी पाटील व अनिल मल्हारी पाटील यांच्यात सामाईक बांधाच्या वहिवाट रस्त्यावरून किरकोळ शाब्दिक वाद झाला. ...

Brotherhood erupted from the farm dam; Six injured, 18 rioted | शेतीच्या बांधावरून भाऊबंदकी उफाळली; सहा जखमी, १८ जणांवर दंगलीचा गुन्हा

शेतीच्या बांधावरून भाऊबंदकी उफाळली; सहा जखमी, १८ जणांवर दंगलीचा गुन्हा

वाघरे गावातील भाऊसाहेब भिकारी पाटील व अनिल मल्हारी पाटील यांच्यात सामाईक बांधाच्या वहिवाट रस्त्यावरून किरकोळ शाब्दिक वाद झाला. शब्दा-शब्दाने वाद वाढला आणि लाठ्या-काठ्यांचा वापर करीत हाणामारी झाली. यात दोन्ही गटांतील सहाजण जखमी झाले.

याबाबत भाऊसाहेब मल्हारी पाटील, सुदाम रमेश पाटील, अनिल पाटील, विक्रम पाटील, सुनील पाटील, रोशन पाटील, पुंडलिक पाटील, रमेश विक्रम पाटील तसेच दुसऱ्या गटातील महेंद्र नाना पाटील, भाऊसाहेब भिकारी पाटील, राजेंद्र पाटील, नाना पाटील, हर्षल पाटील, योगेश कृष्णा पाटील, महिपाल पाटील, कृष्णा भिकारी पाटील, रोहित व पंकज कौतिक पाटील अशा भाऊबंदकीतील १८ जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हे. कॉ. विनोद साळी करीत आहेत.

Web Title: Brotherhood erupted from the farm dam; Six injured, 18 rioted