शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

बंगाली कारागीराला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 22:30 IST

जळगाव : दुकानावर कामासाठी जात असलेल्या सागर मोहन बेसार (२८ मुळ रा. वर्धमान मेमारी, सुलतानपूर, ता.जि. वर्धमान, पश्चिम बंगाल,ह.मु.जोशी ...

जळगाव : दुकानावर कामासाठी जात असलेल्या सागर मोहन बेसार (२८ मुळ रा. वर्धमान मेमारी, सुलतानपूर, ता.जि. वर्धमान, पश्चिम बंगाल,ह.मु.जोशी पेठ, जळगाव) या बंगाली कारागिराला दोन जणांनी बेदम मारहाण करुन त्याच्याकडील मोबाईल व रोख ८०० रुपये लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सचिन प्रदीप भावसार (२५,रा. चौघुले प्लॉट) यास शहर पोलिसांनी रविवारी अटक केली आहे. त्याच्याकडून गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर हा तरुण बंगालमधील मुळ रहिवासी असून सहा महिन्यापासून जळगावातील जोशीपेठ येथे वास्तव्यास आहेत. कलाम शेख यांच्याकडे सोन्याच्या दागिण्यांना पॉलीश करण्याचे काम करतो.सोबत राहणाऱ्या अजीम कलाम शेख याने सागर बेसार यास मोबाईल वापरण्यास दिला आहे. १५ रोजी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास सागर हा राजकमल सिनेमागृहाजवळून नाश्ता करुन पुन्हा दुकानावर जात असतानादोन अनोळखी तरुणांनी त्यास आवाज देवून बोलाविले. याकडे सागरने दुर्लक्ष केले, यानंतर संबंधित दोघेही सागरजवळ आले. त्यातील एकाने सागरच्या शर्टाची कॉलर पकडून दुसºयाने लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच सागरच्या खिशातील सहा हजार रुपयांचा मोबाईल तसेच रोख ८०० रुपये हिसकावून घेतले. तसेच या घटनेबाबत कुणाला काही सांगितले, तर तुला जिवंत ठेवणार नाही, शी धमकी दिली. व दुचाकीवरुन पोबारा केला.या घटनेप्रकरणी सागर बेसार याच्या फिर्यादीवरुन दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला. सागर याने सांगितलेल्या वर्णनानुसार पोलिसांनी तपासचक्रे फिरविली. यात सचिन भावसार याचे नाव निष्पन्न झाले. त्यानुसार त्यांनी पोलीस निरीक्षक अरुण निकम यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील वासुदेव सोनवणे, सुनील पाटील, गणेश शिरसाळे, गणेश पाटील, नरेंद्र ठाकरे, अक्रम शेख, नवजीत चौधरी, विजय निकुंभ, रतन गीते, योगेश साबळे, भास्कर ठाकरे यांच्या पथकाने सचिन भावसार यास शहरातून अटक केली. चौकशीत त्याने त्याच्या तायडे या साथीदाराचे नाव सांगितले असून गुन्ह्याची कबूली दिली. त्याच्याकडून गुन्ह्यातील मोबाईल तसेच ८०० रुपये हस्तगत करण्यात आले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव