श्रीक्षेत्र कपिलेश्वर तीर्थस्थळी गजानन महाराज पालखीचे आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:20 IST2021-08-25T04:20:51+5:302021-08-25T04:20:51+5:30

श्रावण सोमवारनिमित्त श्री साई गजानन सेवा मंडळ अमळनेर या भाविक भक्तांनी दिंडीचे आयोजन केले होते. ढेकु रोडस्थित श्री ...

Arrival of Gajanan Maharaj Palkhi at Shrikshetra Kapileshwar Shrine | श्रीक्षेत्र कपिलेश्वर तीर्थस्थळी गजानन महाराज पालखीचे आगमन

श्रीक्षेत्र कपिलेश्वर तीर्थस्थळी गजानन महाराज पालखीचे आगमन

श्रावण सोमवारनिमित्त श्री साई गजानन सेवा मंडळ अमळनेर या भाविक भक्तांनी दिंडीचे आयोजन केले होते. ढेकु रोडस्थित श्री मोठे बाबा मंदिरापासून धार-मारवड-कळमसरे-निममार्गे सुमारे २७ कि.मी. पायी सुमारे २५० स्री-पुरुष नाचत-गात, गजानन महाराज, श्री ओम साईच्या गजरात दुपारी श्री क्षेत्र कपिलेश्वर देवस्थानी पोहोचले. कपिलेश्वर मठाधिपती महामंडलेश्वर हंसानंदजी महाराजांनी दिंडीचे स्वागत केले. कळमसरे येथे सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांनी पालखीचे पूजन करून, भाविकांना प्रसाद वाटप केला.

श्री साई गजानन सेवा मंडळाचे अध्यक्ष एस. एम. पाटील, उपाध्यक्ष सूर्यकांत दहाडे, सचिव आर. व्ही. पाटील, विस्तार अधिकारी एस. डी. सोनवणे, ग्रामसेवक संघटनेचे जी. एम. पवार व विश्वस्त मंडळ या दिंडीत सहभागी होते. कपिलेश्वर संस्थानचे मगन वामन पाटील यांनी मंदिरावर स्वागत समारंभ, सूत्रसंचालन केले.

---

२५/४

Web Title: Arrival of Gajanan Maharaj Palkhi at Shrikshetra Kapileshwar Shrine