शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
13
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
14
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
15
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
16
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
17
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
18
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
20
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"

चाळीसगावच्या नायब तहसीलदाराला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 12:26 PM

एसीबीची कारवाई 

जळगाव : जळगावचे तत्कालीन व चाळीसगावचे विद्यमान नायब तहसीलदार देवेंद्र सुरेश भालेराव (५२, रा. मोहन नगर, जळगाव) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी पाठलाग करुन साडे सहा वाजता ख्वॉजामिया चौकातून अटक केली.वडीलोपार्जीत घर नावावर करण्यासाठी जळगाव तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्याला २०१६ मध्ये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते. या प्रकरणाची चौकशी व न्यायालयात आरोपीने या प्रकरणात नायब तहसीलदार भालेराव यांचाही सहभाग असल्याचे सांगितले होते. त्यामुळे न्यायालयाने भालेराव यांना हजर राहण्याचे समन्स काढले होते. दोनवेळा समन्स काढल्यावरही भालेराव हजर झाले नाहीत, त्यामुळे न्यायालयाने मंगळवारी अटक वारंट काढले.असा रचला सापळान्यायालयाचे आदेश मिळाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक जी.एम.ठाकूर यांनी पोलीस निरीक्षक नीलेश लोधी, ईश्वर धनगर, प्रशांत ठाकूर व इतर सहकाऱ्यांना सापळा लावण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार पथकाने काही कर्मचारी चाळीसगाव तहसील कार्यालय तर काही कर्मचारी भालेराव याच्या घराच्या बाहेर तैनात केले होते. भालेराव जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीसाठी आल्याचे समजले. सायंकाळी ते तेथून घरी गेले. घरुन दहा मिनिटात ते बाहेर निघाले. त्यानंतर पोलीस निरीक्षक नीलेश लोधी, ईश्वर धनगर व प्रशांत ठाकूर यांनी त्यांचा पाठलाग करुन ख्वॉजामिया चौकात त्यांना अडवले. तेथून अटक केल्यानंतर रात्री त्यांना जिल्हा पेठ पोलीस स्टेशनच्या कोठडीत ठेवण्यात आले.

टॅग्स :Jalgaonजळगाव