शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

शासनाकडून आणखी एक नोटीस

By admin | Updated: March 17, 2017 00:11 IST

मुक्ताईनगर : पाणीपुरवठा योजना अपहार प्रकरण, 12 पदाधिका:यांकडून होणार वसुली

मुक्ताईनगर : तालुक्यात 2007-08 व 2008-09 या वर्षात अनुक्रमे मंजुरी मिळालेल्या व सुधारित अंदाजपत्रकाला पाणीपुरवठा योजनेअंतर्गत मंजुरी दिल्यानंतर मूल्यांकनात अपहार झाल्याचे निष्पन्न झाल्याने तालुक्यातील सहा गावे व 12 पदाधिका:यांकडून अपहारीत रक्कम वसूल करण्याचे व 17 र्पयत पैसे न भरल्यास गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिका:यांनी दिले. या संपूर्ण प्रकरणामुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. 14 मार्च रोजी पुन्हा एक नोटीस प्राप्त झाली आहे. चिंचखेडा बु.।। येथील तत्कालीन समितीचे अध्यक्ष  नरेंद्र माणिकराव गावंडे यांना 14 रोजी नोटीस मिळाली आहे. त्यांच्याकडून 37 हजार 371 रुपये वसूल करण्याचे आदेश देण्यात आले आहे, अशी माहिती गटविकास अधिकारी डी.आर. लोखंडे यांनी दिली. त्यामुळे आता एकूण सहा गावांसाठी 12 पदाधिका:यांविरुद्ध नोटीस बजावण्यात आल्या असून आता वसुलीची रक्कम 10 लाख सहा हजार 120 एवढी झाली आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील महालखेडा (दोन), अंतुर्ली (दोन), तरोडा-भांडगुरा (दोन) व चांगदेव (दोन), चिखली (दोन) तसेच चिंचखेडा बु।।(दोन) या सहा गावांसाठी मूळ अंदाजपत्रकांसाठी 2007-08 व 2008-09 या आर्थिक वर्षांमध्ये 12 पाणीपुरवठा मंजूर झाल्या होत्या. त्यानंतर 2009-10 व 2010-11 मध्ये त्यांना सुधारित अंदाजपत्रके मंजूर करून रक्कम वाढवून घेतल्या.या गावांमधील योजनांमध्ये झाला अपहार  महालखेडा (दोन), अंतुर्ली (दोन), तरोडा-भांडगुरा(दोन) व चांगदेव (दोन), चिखली (दोन) तसेच चिंचखेडा बु।।(एक) या सहा गावांसाठी मूळ अंदाजपत्रकांसाठी 2007-08 व 2008-09 या आर्थिक वर्षामध्ये 11 पाणीपुरवठा मंजूर झाल्या होत्या. त्यानंतर 2009-10 व 2010-11 मध्ये त्यांना सुधारित अंदाजपत्रके मंजूर करून रक्कम वाढवून घेतल्या.अपहारीत रक्कम वसुली संदर्भात 14 मार्च रोजी पुन्हा एक नोटीस चिंचखेडा बुद्रूक येथील तत्कालीन पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष नरेंद्र गावंडे यांना मिळाली आहे. अपहारातील रक्कम वसूल करण्याची प्रक्रिया वरिष्ठांच्या आदेशावरुन केली जाईल.- डी.आर. लोखंडे, गटविकास अधिकारी