शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

आनंदनगर तांड्याचा पाणीप्रश्न सुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:12 IST

निपाणे, ता. एरंडोल : आनंदनगर तांडा या गावासाठी ८२ लाख रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली असून ...

निपाणे, ता. एरंडोल : आनंदनगर तांडा या गावासाठी ८२ लाख रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली असून लवकरच याची निविदा निघणार असल्याची घोषणा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली. यामुळे या ठिकाणचा पाणी प्रश्न सुटणार आहे.

आनंदनगर तांडा येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत सत्कार समारंभ पार पडला. गुलाबराव पाटील यांचा हा जुना मतदारसंघ असल्यामुळे जुने पदाधिकारी व कार्यकर्ते या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. याप्रसंगी गुलाबराव पाटील यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत १५ लाखांचे सभामंडप व आनंद नगर ते ताडे फाटा रस्ता व नाल्यावर फरशी आदी कामेही मंजूर करणार असल्याची ग्वाही दिली.

आमदारांच्या अनुपस्थितीची चर्चा

या कार्यक्रमाला एरंडोल पारोळा मतदारसंघाचे आमदार चिमणराव पाटील, जळगाव जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, जिल्हा परिषद सदस्या वैशाली गायकवाड, पंचायत समिती सभापती शांताबाई महाजन, उपसभापती अनिल महाजन तसेच आमदार चिमणराव पाटील यांचे अनेक समर्थक अनुपस्थित होते. हा विषय परिसरात चर्चेचा ठरला आहे.

यावेळी ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार केला. तर गुलाबराव पाटील यांनी ज्येष्ठांचा व शिफारस केलेल्या तालुक्यातील विविध समित्यांवर निवड करण्यात आलेल्यांचा सत्कार केला.

या प्रसंगी शिवसेनेचे लोकसभा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, शिवसेनेच्या महिला आघाडी जिल्हाप्रमुख महानंदा पाटील, तालुकाप्रमुख वासुदेव पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख जगदीश पाटील, उपतालुका प्रमुख रवि चौधरी, माजी सभापती दत्तू पाटील, युवासेनेचे परमेश्वर राठोड, नायब तहसीलदार शिरसाठ, सरपंच गजानन राठोड, तळई -उत्राण गटाचे गटविभाग प्रमुख देशमुख राठोड, सेठाणी राठोड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक गजानन पाटील, माजी उपसरपंच ज्ञानेश्वर बडगुजर, गालापूर सरपंच महेंद्र महाजन, हणुमंतखेडेसिम सरपंच विनोद पाटील, गालापूर माजी सरपंच अरिफ शेख, ताडे माजी सरपंच शांताराम पाटील यांच्यासह परिसरातील शाखा प्रमुख पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटो : २९ एचएसके 02

गुलाबराव पाटील यांचा सत्कार करताना. सोबत महानंदा पाटील व इतर पदाधिकारी.