शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

कापूस, सोयाबीननंतर आता केळीचेही मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 19:13 IST

अनेक भागात हानी : वादळी पावसाने गाढोदा, कठोरा, किनोद भागात केळीला फटका

जळगाव : अवकाळी पावसामुळे कापूस, सोयाबीन व ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आतापर्यंत झालेल्या पावसामुळे केळीला कोणताही फटका बसला नव्हता. मात्र, गुरुवारी रात्री तालुक्यातील गाढोदा, कठोरा, किनोद, भादली भागात झालेल्या वादळी पावसामुळे केळीच्या कांदेबागाचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे ऐन काढणीवर असलेले केळीचे घड कोसळले असल्याने केळी उत्पादक शेतकरीही अडचणीत सापडला आहे.यंदा झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकरी पूर्णपणे उध्वस्त झाला आहे. हातातोंडाशी आलेले पीक नष्ट झाल्यामुळे शेतकºयासमोर कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणात संकट उभे ठाकले आहे. आतापर्यंत झालेल्या पावसामुळे सोयाबीन, ज्वारी व कापूसचेच नुकसान झाले होते. केळीला तसा जास्त पावसाचा फायदाच झाला होता. मात्र, अरबी समुद्रावर आलेल्या माहा चक्रीवादळाच्या परिणामस्वरुप गुरुवारी सायंकाळी आलेल्या वादळी पावसामुळे तालुक्यातील केळीच्या बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. कठोरा, भादली, सावखेडा या भागात मोठे नुकसान झाले आहे. तर आव्हाणे, गाढोदा, पळसोद या भागातही काही प्रमाणात नुकसान झाले आहे.केळीचे झालेल्या नुकसानामुळे प्रशासनाने तत्काळ उध्वस्त झालेल्या केळीच्या बागांमध्ये जावून नुकसानीचा पंचनामा करण्याची मागणी कठोरा येथील शेतकरी गोकुळ मोहन जाधव यांनी केले आहे. गाढोदा परिसरात देखील निलेश रामचंद्र पाटील यांच्या केळीचाही बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.कापूस काढण्यासाठी मोठी कसरत सुरुशेतांमध्ये कापूस फुलला आहे अनेक ठिकाणी कापसाचे नुकसान झाले आहे. मात्र, ज्या भागात कापूस शेतांमध्ये फुलला आहे. तो कापूस वेचताना शेतकरी व मजूरांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. शेतरस्त्यांवर मोठ्या प्रमाणात चिखल साचल्यामुळे शेतकऱ्यांना बैलगाडी शेतापर्यंत नेता येत नाही. त्यातल्या त्यात कापूस वेचणीसाठी मजूर शेतामध्ये जरी पोहचले तरी चिखलामुळे पाय शेतांमध्ये रुतत असल्याने कापूस वेचणी करताना मोठ्या प्रमाणात त्रास करावा लागत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीJalgaonजळगाव