शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

वकिलाने लगावली कानशिलात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2017 00:57 IST

भूसंपादनाचा वाद : शेतक:याने दिली जिल्हापेठ पोलीस स्टेशनला तक्रार

जळगाव : प्रकल्प बाधीत जमिनीचा मोबदला घेण्यासाठी गेलेल्या शालिग्राम साहेबराव सोनवणे (वय 58 रा.बुधगाव, ता.चोपडा ह.मु.धुळे) या शेतक:याला त्यांचे वकील संदीप ज्ञानेश्वर पाटील (रा. शिवकॉलनी, जळगाव) यांनी कानशिलात लगावल्याची घटना सोमवारी दुपारी वकीलाच्या कार्यालयात घडली. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला वकीलाविरुध्द अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली आहे.शालिग्राम सोनवणे यांची बुधगाव, ता.चोपडा येथील गट क्र.49/1 ही शेत जमीन तापी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रासाठी संपादित झालेली आहे. या जमिनीच्या मोबदल्यासाठी त्यांना 74 लाख रुपये मंजूर झाले आहेत. 40 लाख रुपये आगाऊ मिळावे यासाठी त्यांनी तापी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्याकडे अर्ज केला आहे. दरम्यान, अॅड.संदीप पाटील हे              बुधगाव येथील प्रकल्पबाधीत शेतक:यांच्यावतीने काम पाहत आहेत. शालिग्राम सोनवणे यांचेही काम त्यांच्याकडे आहे. मोबदल्यासाठी तुम्ही परस्पर अर्ज कसा केला या कारणावरुन वकील व शेतकरी यांच्यात वाद झाला. त्यानंतर सोमवारी सात लाख रुपये देण्याचे ठरले. ही रक्कम घेण्यासाठी सोनवणे हे जळगावात आले होते. दुपारी 3 ते 4 वाजेर्पयत वकीलांच्या कार्यालयात मोबदल्यावरुन वाद सुरु होता. रक्कम देण्याआधी वकीलांनी ताबा मिळाला म्हणून को:या पावत्यावर सह्या घेण्याचा प्रय} केला. त्यास शेतक:याने विरोध केला असता दोघांमध्ये वाद होवून वकीलांनी आपल्या कानशिलात लगावली. दरम्यान, ‘मी सांगेल त्या ठिकाणी तुला सह्या कराव्या लागतील, नाही केल्या तर तुला जळगावात पाय ठेवू देणार नाही’ असे धमकावत मारहाण केली व जीवे ठार मारण्याची धमकी दिली, असे सोनवणे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.आज सात लाख रुपये देण्याचे वकीलाने मान्य केले होते.                    को:या पावत्यावर सह्या करण्यास विरोध केल्याने वकीलाने मला  मारहाण करुन कानशिलातही लगावली. त्यांनी मला ठार मारण्याची धमकी दिली आहे.               -शालिग्राम सोनवणे, शेतकरी, बुधगावमाङयाकडे कोणताही शेतकरी आला नाही व मी कोणाच्याही को:या पावत्यावर सह्या घेतल्या नाहीत.-अॅड.संदीप पाटील