शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
2
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
3
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
4
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
5
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
6
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
7
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
8
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
9
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
10
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
11
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
12
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
13
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
14
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
15
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
16
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
17
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
18
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
19
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
20
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनाचा कारभार बिबट्यांच्या जीवाशी

By admin | Updated: July 1, 2014 14:45 IST

वाघांची संख्या घटल्याने बिबट्यांच्या शिकारीकडे तस्कर वळले आहेत. सुस्त आणि गाफील प्रशासनाची मेख ओळखून शिकारी वनांमध्ये सक्रीय झाले आहेत.

आता बिबटे बनले लक्ष्य
वाघांची संख्या घटल्याने बिबट्यांच्या शिकारीकडे तस्कर वळले आहेत. सुस्त आणि गाफील प्रशासनाची मेख ओळखून शिकारी वनांमध्ये सक्रीय झाले आहेत. वाघांची संख्या कमी झाल्याने बिबट्याच्या कातडीला बाजारात चांगली मागणी आहे. शौकीन यासाठी मागेल ती किंमत मोजायला तयार असतात. जळगाव : जिल्ह्यातील बिबट्यांचा अधिवास प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे धोक्यात सापडला आहे. कातडीच्या तस्करीसाठी यांची शिकार होत असून त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर वन विभागाने तातडीने संवर्धन मोहीम हाती घेतली पाहिजे, अशी अपेक्षा पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केली आहे. 
या महिन्यात बिबट्याच्या कातडीच्या तस्करीच्या दोन घटना समोर आल्या आहेत. प्रशासनाच्या सुस्त कारभारामुळे जिल्ह्यातील यावल अभयारण्य, यावल वनविभाग, मुक्ताईनगर वनविभाग आणि चोपडा वनक्षेत्रातील बिबट्यांचा अधिवास धोक्यात सापडला असल्याचे वन्यजीव अभ्यासकांचे म्हणणे आहे.
वन्यजीवांच्या संवर्धन आणि विकासाकरिता वन विभाग उदासिन असल्याने त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. प्रशासनाचा नाकर्तेपणा मुक्या जीवांवर बेतत असून वरिष्ठ अधिकारीदेखील याची दखल घ्यायला तयार दिसत नाही. स्थानिक अधिकर्‍यांना वरिष्ठांचा धाक नसल्याने ते आपला मनमानी कारभार करीत आहेत. अशीच अवस्था कायम राहिल्यास जिल्ह्यातील वन्यजीवांचे अस्तित्व कायमचे नामशेष होईल. 
प्रशासनाने वेळोवेळी आपली भूमिका निभावण्याचे टाळल्याने यावल अभयारण्य आणि यावल वनविभागाची वाट लागली. तसेच व्याघ्र संवर्धन प्रकल्पातील डोलारखेडा येथे मोठी वृक्षतोड झाली. या सर्व घडामोडी ताज्या असतानाच गुरुवारी चोपडा तालुक्यातील मेलाणे या गावात एका गुन्हेगारास बिबट्याच्या कातडीसह अटक केली. वन विभागाची उदासिन कारभाराचे हे उत्तम उदाहरण ठरेल. याअगोदर याच महिन्यात १२ जून रोजी यावल तालुक्यात एकला बिबट्याच्या कातडीसह पकडले होते.
वन आणि वन्यजीवांची अनास्था पर्यावरण विकास आणि संवर्धनाला हानीकारक आहे. अपवाद वगळता स्थानिक आदिवासी आणि राजकीय नेत्यांच्या रोष स्वत:वर ओढवून घेण्याची हिम्मत वन विभागाने दाखविलेली नाही. त्यामुळे आज बिबट्याचा अधिवास धोक्यात आला आहे. 
आजरोजी यावल अभयारण्य, यावल वनविभाग, मुक्ताईनगर वन विभाग आणि चोपडा वनक्षेत्रात जवळ-जवळ २५ ते ३0 बिबटे आहेत. त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न न झाल्यास कातडी तस्करीच्या घटना घडत राहतील हे निश्‍चित.
 
या आहेत कमतरता
■ गस्त घालण्यात कामचुकारपणा 
■ सुस्त अधिकारी
■ अप्रशिक्षित कर्मचारी
 ■ कर्मचार्‍यांची रिक्त पदे
■ मागासलेले तंत्रज्ञान आणि कार्यपद्धती
 
आता बिबटे बनले लक्ष्य
वाघांची संख्या घटल्याने बिबट्यांच्या शिकारीकडे तस्कर वळले आहेत. सुस्त आणि गाफील प्रशासनाची मेख ओळखून शिकारी वनांमध्ये सक्रीय झाले आहेत. वाघांची संख्या कमी झाल्याने बिबट्याच्या कातडीला बाजारात चांगली मागणी आहे. शौकीन यासाठी मागेल ती किंमत मोजायला तयार असतात.