जळगाव-धुळे रस्त्यावर भीषण अपघात, 5 जणांचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2018 08:16 IST2018-05-12T07:53:59+5:302018-05-12T08:16:09+5:30
कार उलटून झालेल्या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

जळगाव-धुळे रस्त्यावर भीषण अपघात, 5 जणांचा जागीच मृत्यू
जळगाव - जळगाव-धुळे रस्त्यावर भीषण अपघात झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर पारोळा तालुक्यातील दळवेल गावाजवळ एका कारला ट्रकची धडक बसली. यावेळी कार उलटून झालेल्या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 5 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये तीन महिलांचा तर 2 पुरुषांचा समावेश आहे. मृत पावलेले सर्व जण पाचोरातील रहिवासी आहेत. शितल वाणी, रमेश वाणी, बंडू वाणी, दिपाली वाणी व एक 6 वर्षांची मुलगी अपघातात जखमी झाली आहे. जखमींना उपचारांसाठी धुळ्यातील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
मृतांची नावे
1. चेतन महाजन
2. प्रितम वाणी
3. अनिता रमेश वाणी
4. शांताबाई सुरेश वाणी
5. नीलिमा वाणी