दोन महिन्यात शहरात ७० कोटींची विकासकामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:59 IST2021-02-05T05:59:14+5:302021-02-05T05:59:14+5:30

यावेळी आमदार सुरेश भोळे यांनी अमृत योजनेच्या कामामुळे रस्त्यांची अतिशय दुरवस्था झाली आहे. नागरिकांच्या दररोज तक्रारी येत आहेत. मात्र, ...

70 crore development work in the city in two months | दोन महिन्यात शहरात ७० कोटींची विकासकामे

दोन महिन्यात शहरात ७० कोटींची विकासकामे

यावेळी आमदार सुरेश भोळे यांनी अमृत योजनेच्या कामामुळे रस्त्यांची अतिशय दुरवस्था झाली आहे. नागरिकांच्या दररोज तक्रारी येत आहेत. मात्र, आता मनपा कर्जमुक्त झाल्यामुळे येत्या मार्चपर्यंत ७० कोटींच्या रस्त्यांचे कामे हाती घेण्यात येणार असल्याची माहिती भोळे यांनी दिली. या कामाचे बजेटही तयार झाले असून, यासाठी प्रशासन व विरोधी पक्षाच्या नेत्यांना विश्वासात घेऊन कामे करण्यात येणार आहे. जळगावाकरांना भेडसावणारे रस्ते व गाळे हे दोन प्रश्न लवकरच सुटणार असल्याचे भोळे यांनी सांगितले.

तसेच आमदार भोळेंनी यावेळी शासनाकडून ४२ कोटींचा निधी आला आहे. मात्र, निधी खर्च करण्यासाठी काही तांत्रिक अडचणी येत आहेत. परंतु, पालकमंत्र्यांनी लक्ष दिले तर या तांत्रिक अडचणी दूर होऊन हा निधी मार्गी लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: 70 crore development work in the city in two months