शहरं
Join us  
Trending Stories
1
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
2
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
3
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
4
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
5
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
6
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
7
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
8
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
9
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
10
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
11
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
12
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
13
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
14
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
15
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
16
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
17
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
18
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
19
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
20
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

४00 थकबाकीदार सोसायट्या

By admin | Updated: January 30, 2015 14:59 IST

मागील आर्थिक वर्षात कर्जाची परतफेड न करणार्‍या जिल्हाभरातील सुमारे ४00 विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांच्या संचालकांना जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मतदानापासून वंचित रहावे लागेल, अशी शक्यता आहे.

 जळगाव : मागील आर्थिक वर्षात कर्जाची परतफेड न करणार्‍या जिल्हाभरातील सुमारे ४00 विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांच्या संचालकांना जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मतदानापासून वंचित रहावे लागेल, अशी शक्यता आहे. ३१ मार्च २0१४ ला कर्जफेड न करणार्‍या सोसायट्यांची संख्या ४00 पर्यंत आहे. यातच नियमानुसार थकबाकीदार सोसायट्यांचे संचालक किंवा थकबाकीदार संचालक मतदान करू शकणार नाही. नियमित कर्ज भरणारा सभासद करू शकतो मतदानथकबाकीदार संचालक मतदान करू शकणार नसले तरी संबंधित सोसायटीमधील नियमित कर्ज भरणारे सभासद मतदान करू शकतील. पण त्यासाठी संबंधित थकबाकीदार सोसायटीच्या पंचमंडळाला किंवा सभेला नियमित कर्ज भरणार्‍या सोसायटीच्या सभासदाच्या नावाचा मतदान करण्यासाठी ठराव करावा लागेल. यानंतर हा ठराव जिल्हा उपनिबंधक कार्यालयास सादर करता येईल. निम्मे सोसायट्या थकबाकीदारजिल्हाभरात ८७७ विविध कार्यकारी सहकारी सोसायट्या आहेत. पैकी जवळपास निम्मे सोसायट्यांमधील संचालक थकबाकीदार असल्याने या सोसायट्यांच्या संचालकांना घोडेबाजाराचा लाभ होणार नाही, अशी चर्चा सुरू झाली आहे. ठराव थेटही पाठविता येणारविविध सहकारी सोसायट्यांना जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंबंधी ठराव पाठविण्याचे पत्र पाठविले आहेत. पण पत्र नाही मिळाले तरी मतदानास पात्र असलेल्या संबंधित सोसायटीचे संचालक मतदानासंबंधीचा ठराव करून तो जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे सादर करू शकतील. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे अजून सोसायट्यांचे ठराव सादर झालेले नाहीत. परंतु सोसायट्यांमध्ये ठराव सादर करण्याची लगबग दिसून येत आहे. येत्या एप्रिल महिन्याच्या मध्यापर्यंत जिल्हा बँकेची निवडणूक घेण्याची तयारी प्रशासनाने केली आहे.