शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मेहरूण तलाव सुशोभिकरणाचा ३४ कोटींचा प्रस्ताव

By admin | Updated: March 9, 2017 00:52 IST

पर्यटन विभागाकडे प्रस्ताव दाखल : चार टप्प्यात विकास

जळगाव : मेहरूण तलावाचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्यासाठी सुशोभिकरणाचा ३३ कोटी ७४ लाखांचा मनपाने दिलेला प्रस्ताव जिल्हाधिकाºयांनी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या प्रधान सचिवांकडे रवाना केला आहे. हा प्रस्ताव मंजूर होऊन निधी उपलब्ध झाल्यास मेहरूण तलावाचा चार टप्प्यात विकास करण्यात येणार आहे. शहरातील एक प्रेक्षणिय स्थळ म्हणून मेहरूण तलावाचा विकास करण्याचे प्रयत्न मनपाकडून सुरू आहेत. त्यासाठी महापौर नितीन लढ्ढा यांच्या पुढाकाराने उन्हाळ्यात तलावातील गाळ लोकसहभागातून उपसण्याची मोहीम राबवण्यात आली. त्यामुळे तलावाची खोली वाढून पाणीसाठा वाढला. तसेच जिल्हा नियोजन व विकास समितीकडून वैशिष्ट्यपूर्ण अनुदानातून मेहरूण तलावासाठी १ कोटीचा निधी मंजूर झाला होता. त्यातून गणेशघाटाचे काम करण्यात आले आहे. तर आणखी १ कोटीचा निधी मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.

चार टप्प्यात मेहरूण तलावाच्या विकासाचा प्रस्ताव मुरुमाचा भराव टाकून तलावाच्या बाजूने जॉगिंग ट्रॅक करणे त्याची लेव्हलींग करणे, पावसाचे पाणी वाहण्यासाठी आरसीसी गटार करणे, तलावाच्या बाजूने उद्यानाजवळ ६ मीटर रूंद १०० मीटर लांब वर्तुळाकार आरसीसी पूल बनवणे, पोलीस चौकी उभारणे आदी कामांचा समावेश असून त्यासाठी ८ कोटी ४७ लाख, ४१हजार २६० रुपये खर्च अपेक्षित आहे. तलाव काठच्या वर्तुळाकार रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे, पार्किंगची व्यवस्था करणे, जॉगिंग ट्रॅक तयार करणे या कामासाठी ८ कोटी ५७ लाख ३५ हजार १७० रुपये खर्च अपेक्षित आहे. तलावाच्या काठाने भिंत उभारणे (टो-वॉल), तलावाच्या काठाचे दगडी पिचिंग करणे, बैठक व्यवस्था करणे, पार्किंगजवळ व जॉगिंग ट्रॅकजवळ वृक्षारोपण करणे, पथदिवे बसवणे, उद्यानात दिवे व हायमास्ट बसवणे, फूड प्लाझा, म्युझिकल वॉटर फाउंटेन, एरोबिक व जीमसाठीचे साहित्य तीन ठिकाणी बसवणे, सुरक्षा रक्षक केबिन व तिकीट खिडकीची व्यवस्था करणे, योगा व ध्यानधारणा हॉल उभारणे या कामांचा समावेश आहे. त्यासाठी ८ कोटी ९ लाख ६३ हजार ७३० रुपये खर्च येणार आहे.  जॉगिंग ट्रॅकवर पेव्हर ब्लॉक बसवणे, बैठक व्यवस्थेच्या ठिकाणी टाईल्स बसवणे, लेक सेंटर वॉल व पक्षी निरीक्षणासाठी टॉवर उभारणे, तलाव ओव्हर फ्लो होण्याच्या ठिकाणी ६ मीटर रूंद व ७५ मीटर लांब पूल उभारणे, पूर्वेकडील बाजूस सांडपाण्यासाठी भुयारी गटार करणे, अ‍ॅम्पी थिएटर व म्युझिकल गार्डन उभारणे, आदी कामे करण्यात       येणार आहे. त्यासाठी ६ कोटी ९९ लाख ६२ हजार ६२८ रुपये खर्च          येणार आहे.