शहरं
Join us  
Trending Stories
1
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
2
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
3
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
4
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
5
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
6
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
7
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
8
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
9
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
10
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
11
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
12
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
13
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले...
14
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
15
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
16
'भुजिया किंग' शिवरतन अग्रवाल यांचे निधन; शुन्यातून उभारले हजारो कोटींचे साम्राज्य...
17
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
18
Gondia Crime: 'तुला जिवे मारीन' म्हणत हात-पाय बांधून शाळेत डांबले; लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण
19
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
20
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात १३३ टक्के पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 12:27 IST

ढगाळ वातावरण कायम, रब्बीचे नियोजन कोलमडले

जळगाव : गेल्या आठवडाभरापासून जिल्हाभरात अकाली आलेल्या पावसामुळे जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. त्यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे़ सततच्या ढगाळ वातावरण व रिमझीम पडणाऱ्या या पावसामुळे पिके अक्षरश: सडायला लागल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे़ आतापर्यंत जिल्हाभरात १३३ टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे़८० ते ८५ टक्के ज्वारीचे नुकसानमध्यतंरीच्या कालखंडात उन पडल्यानंतर ज्यांनी ज्यांनी ज्वारी काढली होती़ त्यांची पंधरा ते २० टक्के ज्वारी हाती लागली असून ८० ते ८५ टक्के ज्वारीचे पूर्णत: नुकसान झाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे़ यासह कपाशीला प्रथमच कोंब फुटण्याचे प्रकार होत आहे़ कपाशीची ५ लाख १० हजार हेक्टरवर लागवड होती़ यातील हलक्या जमीनीवरी कपाशीने तग धरला मात्र काळी जड जमिनीवरील कपाशीचे पूर्णत: नुकसान झाले आहे़ चारा पूर्णत: नष्ट झाला आहे़ यासह सोयाबीन व अन्य पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे़आॅक्टोबरमध्ये पावसाची धूमऐरव्ही आॅक्टोबर हिटचा अनुभव घेणाºया जिल्हावासीयांना यंदा आॅक्टोबरमध्ये पावसाचा अनुभव घ्यावा लागत आहे़आॅक्टोबरच्या अखेरीस झालेला हा अवकाळी पाऊस पिकांसाठी धोकादाक ठरला़ हा पाऊस नसता तर समाधानकारक उत्पन्नाची अपेक्षा होती़ आता पर्यंत जिल्हाभरात १३३ टक्के पाऊस झाला आहे़म्हसावद परिसरात मक्याला फुटले कोंबगेल्या आठवड्यापासून पावसाची संततधार सुरू आहे. अतिवृष्टीमुळे वावडदा, म्हसावद, बोरनार, जळके, विटनेर, पाथरी आदी गावात मका, कापूस, ज्वारीसह पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मक्याच्या कणसाला कोंब फुटले आहेत तसेच मक्याचे दाणे गळून पडले आहेत. ज्वारीचेही प्रचंड नुकसान झाले आहे. पिकांसाठी खर्च केलेले पैसेही शेतकºयांच्या पदरी पडणार नाहीत, एवढी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्वरित पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.अद्याप पंचनामे नाहीतनिवडणुकीच्या रणधुमाळीत व दिवाळीच्या सलग सुट्टुयांमुळे अकाली पावसाच्या नुकसानीची आकडेवारी अद्याप समोर आलेली नाही़ पंचनाम्यांसंदर्भात अद्याप हालचाली नसल्याचे चित्र आहे़ दरम्यान, स्थानिक पातळीवर पंचनाम्यांसंदर्भात कळविण्यात आल्याचे कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांनी सांगितले़ दरम्यान, अनेक भागांमध्ये पाऊस थांबला असला तरी ढगाळ वातावरण कायम असल्याने यामुळेही पिकांवर विपरीत परिणाम होत आहे़ मात्र, रब्बीत गहू व हरभºयाचे क्षेत्र वाढणार असून अडीच लाख हेक्टरवर रब्बीचे नियोजन करण्यात आले आहे़ यासाठी ८ ते ९ नोव्हेंबरपासून हालचाली होणार असल्याचे समजते़सर्वाधिक रावेर तालुक्यात १४९ टक्के, जामनेर १४५ टक्के, बोदवड १४०, यावल १३९, पारोळा १३७, मुक्ताईनगर, एरंडोल १३५, चाळीसगाव १३२, भुसावळ १३२, पाचोरा १३१, भडगाव, १२९, अमळनेर १२८, चोपडा १२०, जळगाव ११४, धरणगाव ११२ असा प्रत्येक तालुक्यात शंभर टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे़

टॅग्स :Jalgaonजळगाव