शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
4
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
5
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
6
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
7
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
8
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
9
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
10
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
11
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
12
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
13
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
14
मोबाईल फक्त निमित्त! तुमची ऊर्जा गुपचूप चोरणाऱ्या 'या' छुप्या गोष्टी तुम्हाला माहितीय का?
15
दोन दिवसांवर आलेल्या लग्नासाठी घेतलेल्या ३० साड्या, ६० हजार खाक; ४ तोळे सोने गायब
16
बीड कारागृहात राजकीय ड्रामा! वाल्मीक कराड गँगकडून मारहाणीचा आरोप अन् 'त्या' कैद्याचा 'यू-टर्न'
17
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
18
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
19
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
20
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या अनास्थेमुळे परत जाणार ३ कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:22 IST

तीन दिवसांच्या आत निधी परत द्या : जिल्हा प्रशासनाचे मनपाला पत्र लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : एकीकडे निधी नसल्याचे ...

तीन दिवसांच्या आत निधी परत द्या : जिल्हा प्रशासनाचे मनपाला पत्र

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : एकीकडे निधी नसल्याचे कारण देत नागरिकांना सुविधांपासून वंचित ठेवणाऱ्या महापालिकेला दोन वर्षांत शासकीय निधी खर्च करता आला नसल्याने ३ कोटी २८ लाख रुपयांचा निधी आता शासनाने जमा करण्याचे आदेश काढले आहेत. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नगरपालिका शाखेने मनपा प्रशासनाला पत्र पाठवून तीन दिवसांच्या आत हा निधी नगरपालिका शाखेकडे जमा करण्याचे आदेश दिले आहेत.

जिल्हा वार्षिक योजनेतून घेण्यात येणारी कामे मनपा प्रशासनाला निर्धारित वेळेत न करता आल्याने अनेक महिन्यांपासून मनपाकडे अखर्चित म्हणून पडून असलेला ३ कोटी २८ लाख रुपयांचा निधी परत शासनाकडे जमा करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने काढले आहेत. दोन वर्षांच्या कालावधीत कामे पूर्ण करून कामांचा पूर्ण निधी दोन वर्षांचा कालावधीत खर्च करणे बंधनकारक आहे. मात्र जळगाव मनपा दोन वर्षांत निधी खर्च न करू शकल्याने खर्च न केलेले ३ कोटी २८ लाख शासनाने परत मागितले आहेत. महानगरपालिकेला २०१५ ते २०१९ या कालावधीत जिल्हा नियोजन समितीने दिलेल्या निधीपैकी ३ कोटी २८ लाख ८७ हजार रुपयांचा निधी अद्याप अखर्चित आहे. ज्यात जिल्हा नगरोत्थान योजना, नागरी दलित वस्ती सुधार योजना व दलित वस्ती सुधार योजना या योजनांचा समावेश आहे.

मनपाचा ढिसाळ कारभार पुन्हा उघड

महापालिकेतील अधिकाऱ्यांकडून शहरातील कामांचे नियोजन करताना मोठ्या प्रमाणात अनागोंदी कारभार सुरू असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. घनकचरा प्रकल्प, अमृत पाणीपुरवठा व भुयारी गटार योजना, शिवाजीनगर उड्डाणपूल, एलईडी योजना असो की शहरातील साफसफाईच्या ठेक्याचे काम, अशा सर्वच योजनांमध्ये मनपा अधिकाऱ्यांचा चुकांचा प्रताप समोर येत आहे. आता पुन्हा शासनाने दिलेला निधी मनपा प्रशासनाला खर्चदेखील करता आलेला नसल्याने मनपाचा भोंगळ कारभार पुन्हा समोर आला आहे.