शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला विचारले १४ प्रश्न; नेमकं काय घडलं?
2
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्यांचे फोनवर फोन
3
दोन्ही मुलांना मैदानात उतरवलं, भारताचंही नाव घेतलं! इम्रान खानच्या खेळीनं पाकच्या राजकारणात खळबळ  
4
जर एखाद्या देशाने 'Nuclear' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
5
पाकिस्तानला लोनवर लोन... चीनसोबत अमेरिकेची वाढती मैत्री तर नाही ना कारण? भारताचं टेन्शन काय?
6
Datta Upasana: जगातील एकमेव दत्तहस्त पूजास्थान; जिथे दत्त महाराजांच्या हाताचे छाप उमटले!
7
"ती भारताबाहेर गेली अन्...", दिग्दर्शकाने सांगितलं 'रेड २'मध्ये इलियानाला न घेतल्याचं कारण
8
नेहा पेंडसेच्या लेकींना पाहिलंत का?, फॅमिलीसोबत बालीत करतेय व्हॅकेशन एन्जॉय
9
रुपाली गांगुलीला सेटवर कुत्रा चावला? 'अनुपमा' फेम अभिनेत्रीचा राग अनावर, म्हणाली- "हात जोडून सांगते.."
10
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
11
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
12
दहशतवाद नाहीसा करणारच! पुलवामाच्या त्रालमध्ये सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक सुरू, २ जण ठार
13
मोदी आदमपूरला जाताच, शाहबाज शरीफांनाही मोह आवरेना! पाकिस्तानी सैन्याच्या टँकवर चढले अन् म्हणाले...
14
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
15
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
16
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण
17
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
18
IPL 2025 : बीसीसीआयनं लागू केला नवा नियम; लगेच 'अनसोल्ड' खेळाडूलाही मिळाला भाव, पण...
19
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
20
'या' कंपनीचा शेअर २३९० वरून ५९ रुपयांवर घसरला; सेबीने केलेली कारवाई, आता नवी माहिती समोर

एस.टी.बस व मालवाहू वाहनाच्या अपघातात २१ प्रवाशी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 23:48 IST

 एस.टी.बस व मालवाहू चारचाकीची समोरासमोर धडक होऊन त्यात बसमधील चालकासह २१ प्रवाशी जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारी ३ वाजता तालुक्यातील पाथरी गावापासून काही अंतरावर घडली.

ठळक मुद्दे पाथरी-सामनेर दरम्यान झाला अपघातबसमध्ये ४९ प्रवाशी

जळगाव :  एस.टी.बस व मालवाहू चारचाकीची समोरासमोर धडक होऊन त्यात बसमधील चालकासह २१ प्रवाशी जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारी ३ वाजता तालुक्यातील पाथरी गावापासून काही अंतरावर घडली.जळगावकडून पाचोराकडे जाणाºया बसवर (क्र.एम एच १४ बीटी ०४१६)  पाचोराकडून जळगावकडे जाणारी मालवाहू चारचाकी (क्र.एम.एच.१९ बीएम २७४९)  बसवर आदळली. बसचालकाने प्रसंगवधान राखून बस खाली उतरवल्याने मोठा अपघात टळला. मालवाहू वाहनाचा चालक अपघात होताच पसार झाला. यामध्ये बस चालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. बसमध्ये महिला, लहान मुलांसह ४९ प्रवासी होते.बस चालक नगराज दशरथ भागवत (५२, रा. गिरड, भडगाव) यांच्या दोन्ही पायाला दुखापत झाली आहे. रामदास राघो पाटील (७०, रा.पाचोरा), कलाबाई भिमसिंग महाले (५०, रा. नगरदेवळा), मनिषा सुभाष बडगुजर (३५ रा. कांचन नगर जळगाव) हे गंभीर जखमी झाले असून त्यांना पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. किरकोळ जखमींमध्ये ज्योती संभाजी बाविस्कर (मानराज पार्क जळगाव), यश संभाजी बाविस्कर (मानराज पार्क जळगाव), जानकाबाई भगवानसिंग राजपूत(नागद, ता.पाचोरा), छाया प्रदीप राजपूत (नागद, ता.पाचोरा), मीराबाई शंकर राठोड, मीराबाई शंकर राठोड, शंकर नगराज राठोड(तळवंद तांडा ता भडगाव ), संगीता भागवत पाटील (मोहरद, ता चोपडा), तुकाराम  सीताराम पाटील ,कोकिळा  तुकाराम पाटील, (पिंपळगाव हरेश्वर, ता.पाचोरा),सुरेखा पाटील (रा.चाळीसगाव) शेहबाज शेख एनरुद्दीन पटेल, विकास किरण पाटील(माहिजी, ता.पाचोरा), यशवंत बाबुलाल पाटील (नगरदेवळा, ता.पाचोरा),  इंदूबाई काशीनाथ कुंभार(पिंप्राळा), महादू तोताराम पाटील (रा. पथराड, ता. भडगाव) व वाहक संगीता किशोर सावळे (रा. पाचोरा) यांचा समावेश आहे.घटनास्थळी पाथरी येथील विनोद अरुण पाटील, पोलीस पाटील संजीव लंगरे, गणेश बडगुजर यांनी जखमींना मदत  करुन उपचारासाठी रवाना केले. घटनास्थळी म्हसावद दूरक्षेत्राचे महेंद्रसिंग पाटील, समाधान पाटील यांनी तातडीने धाव घेतली. चारचाकी चालकाचे नाव राजेश अर्जुनदास दाखनेजा (वय ४२, रा. सिंधी कॉलनी, पाचोरा) असल्याचे पोलीसांनी सांगितले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव