शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
2
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
3
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
4
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
5
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
6
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
7
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
8
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
9
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
10
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
11
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
12
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
13
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
14
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
15
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
16
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
17
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
18
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
19
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
20
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
Daily Top 2Weekly Top 5

12 डॉक्टर्सना बजावल्या नोटीसा

By admin | Updated: April 18, 2017 00:20 IST

बोगस डॉक्टर शोध मोहीम : पाचो:याच्या पथकाला अनेक ठिकाणी आढळल्या त्रुटी

पाचोरा : शहर  व तालुक्यात बोगस डॉक्टर शोध मोहिमेचा धडक कार्यक्रम शासनाच्या आदेशानुसार सुरू असून आजपावेतो शासकीय निकषानुसार पथकाने ग्रामीण भागातील 50  डॉक्टरांची तपासणी केली. यापैकी 12 जणांच्या त्रुटी आढळल्याने  तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान वाघ यांनी त्यांना नोटीस जारी केल्या आहेत.
याबाबत प्राप्त माहिती अशी की , शासनाच्या वैद्यकीय सेवेसंदर्भात ठरवून दिलेल्या निकषानुसार डीएचएमएस, बीएचएमएस डॉक्टरांना होमिओपॅथीचीच प्रॅक्टीस करणे गरजेचे असते मात्र काही डॉक्टर्स आयलोपॅथीची उपचार पद्धती अवलंब करीत आहेत हे बेकायदेशीर आहे. तसेच ब:याच ठिकाणी बीईएमएस पदवी धारकांना हा व्यवसाय करण्यास परवानगी नाही तरीही सर्रासपणे आर एम पी सारखे बोगस पदवीधर दवाखाने थाटून सर्रासपणे बेकायदेशीपणे वैद्यकीय सेवा करीत आहे आणि जनतेच्या जिवाशी खेळत आहेत यामुळे नको ते उपचार होऊन रुग्ण अधिक संकटात सापडत असल्याचे निदर्शनास आले आहे यामुळे शासनास शोधमोहीम घेणे भाग पडले आहे. पाचोरा तालुक्यात ग्रामीण भागासाठी शोध पथक स्थापन केले असून तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ समाधान वाघ, तहसीलदार बी. ए. कापसे, पाचोरा एपीआय सचिन सानप यांचे नेतृत्वाखाली बोगस डॉक्टरशोध पथक तपासणी सुरू आहे ग्रामीण भागात आजपयर्ंत नागरदेवला पिंपळगाव हरे, लोहार, कलमसरे, शिंदाड नांद्रा कुरंगी लोहटार, भोजे कुर्हाड बालद, अंतुर्ली आदी ठिकाणी तपासणी करण्यात आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ वाघ यांनी दिली 
दरम्यान ग्रामीण भागात बरेच ठिकाणी बोगस डॉक्टर आहेत मात्र पथक येणार म्हणून अगोदरच असे डॉक्खर सावध झाल्याने तपासणी अभियानाचा फज्जा उडवित आहे. पाचोरा शहरातदेखील शोध मोहीम सुरू असून दवाखान्यामध्ये अप्रशिक्षित कर्मचा:यांकडूनच कामे करून घेतली जात आहेत. त्यातच रुग्णांना योग्य सुविधा न देता काही जण प्रचंड लूट व कट प्रॅक्टस करीत आहे. शहरात पाचोरा  ग्रामीणरुग्णालयाचे डॉ मंदार करंबलेकर यांचे नेतृत्व खाली तपासणी सुरू आहे. 
ही तपासणी व शोध मोहीम यापुढेही सुरूच राहील काही तक्रारी असल्यास  नागरिकांनी कळवाव्यात.
- डॉ मंदार करंबेळकर, वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय पाचोरा
 नागरिकांनी बोगस डॉक्टर संदर्भात माहिती द्यावी नाव गुप्त ठेवले जाईल, तसेच काही बाबी न्यायप्रविष्ट असल्याने कारवाई करण्यास अडचणी येत आहेत.
-डॉ समाधान वाघ, तालुका वैद्यकीय अधिकारी,  पाचोरा 
बोगस डॉक्टर शोध मोहीम चांगली असून डॉक्टर असोसिएशनचे पूर्ण सहकार्य आहे शासन निर्णयाप्रमाणे तपासणी करणे अपेक्षित आहे.
-डॉ. रुपेश पाटील , पाचोरा डॉक्टर असो.अध्यक्ष
बोगस डॉक्टर शोध मोहिमेत पथकाने पारदर्शकता ठेवावी , डॉक्टरांच्या अडचणी समजून घ्याव्यात ,शासनाने काही नियम शिथिल करणे आवश्यक आहे .
-डॉ. भूषण मगर