जाळीचा देव येथील यात्रा रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:28 IST2021-02-14T04:28:15+5:302021-02-14T04:28:15+5:30

पारध : मराठवाडा व विदर्भाच्या सीमेवर असलेल्या जाळीचा देव येथील चक्रधर स्वामींची यात्रा यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात ...

Yatra at Jalicha Dev canceled | जाळीचा देव येथील यात्रा रद्द

जाळीचा देव येथील यात्रा रद्द

पारध : मराठवाडा व विदर्भाच्या सीमेवर असलेल्या जाळीचा देव येथील चक्रधर स्वामींची यात्रा यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे यात्रेला येणाऱ्या भाविकांचा हिरमोड झाला आहे. जाळीचा देव यात्रा, रथोत्सव परिसरात प्रसिद्ध आहे. दरवर्षी दांडी पौर्णिमेला ही यात्रा भरते. चक्रधर स्वामींचे अनुयायी भारतभर असल्याने याठिकाणी यात्रेला मोठी गर्दी होते. आसपासच्या गावांतून, बाहेरूनही मोठ्या प्रमाणावर भाविक यात्रेला येतात. यात्रा काळात येथील आश्रमात मोठी गर्दी होते. साधारण तीन दिवस ही यात्रा चालते. परंतु, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने ही यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला असून, दांडी पौर्णिमेपासून तीन दिवस मंदिर बंद राहणार आहे. यात्रा होणार नसल्याने परिसरातील व्यापाऱ्यांचेही मोठे नुकसान होणार आहे.

(फोटो)

Web Title: Yatra at Jalicha Dev canceled