कालव्यात पडलेली महिला बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:27 IST2020-12-23T04:27:36+5:302020-12-23T04:27:36+5:30

वडीगोद्री : धुणे धुताना अचानक कालव्यात पडलेली महिला बेपत्ता झाली आहे. दिवसभर शोध घेऊनही तिचा शोध लागला नाही. ही ...

Woman missing in canal | कालव्यात पडलेली महिला बेपत्ता

कालव्यात पडलेली महिला बेपत्ता

वडीगोद्री : धुणे धुताना अचानक कालव्यात पडलेली महिला बेपत्ता झाली आहे. दिवसभर शोध घेऊनही तिचा शोध लागला नाही. ही घटना मंगळवारी सकाळी अंबड तालुक्यातील दह्याळ शिवारातील जायकवाडीच्या डाव्या कालव्यात घडली.

सुषमा गणेश बर्वे (२५ रा. दह्याळ) असे बेपत्ता झालेल्या महिलेचे नाव आहे. सध्या जायकवाडीच्या डाव्या कालव्याला शेती सिंचनासाठी पाण्याचे आवर्तन सुरू आहे. सोमवारी काही प्रमाणात कालव्याचे पाणी कमी झाल्याने आतील फरशा उघड्या पडल्या होत्या. तसेच फरशीवर शेवाळ होते. दह्याळ गावातील एक महिला सोमवारी सकाळी धुणे धुण्यासाठी या डाव्या कालव्यात गेली होती. त्यावेळी पाय घसरल्याने ती महिला कालव्यात पडली. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तातडीने कालव्यात उड्या घेऊन महिलेचा जीव वाचविला. त्यानंतर मंगळवारी सकाळी याच गावातील सुषमा गणेश बर्वे (२५) या डाव्या कालव्यात धुणे धुण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी कालव्यात पडल्याने त्या वाहून गेल्या. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन दिवसभर शोध मोहीम राबविली. मात्र, त्या शोध मोहिमेला रात्री उशिरापर्यंत यश आले नव्हते.

Web Title: Woman missing in canal