दृष्टिदोष तपासणी शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:26 IST2021-02-15T04:26:53+5:302021-02-15T04:26:53+5:30

कारवाईची मागणी बदनापूर : राज्य शासनाने बंदी घातलेल्या गुटख्याची शहरासह ग्रामीण भागात अवैधरीत्या विक्री सुरू आहे. पानटपऱ्या, किराणा दुकानांमध्येही ...

Visual impairment camp | दृष्टिदोष तपासणी शिबिर

दृष्टिदोष तपासणी शिबिर

कारवाईची मागणी

बदनापूर : राज्य शासनाने बंदी घातलेल्या गुटख्याची शहरासह ग्रामीण भागात अवैधरीत्या विक्री सुरू आहे. पानटपऱ्या, किराणा दुकानांमध्येही गुटखा सहज उपलब्ध होत आहे. संबंधित विभागाने लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त

जालना : शहरातील लक्कडकोटसह परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली आहे. ठिकठिकाणच्या नाल्या तुंबल्याने दुर्गंधी पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या भागात स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.

राठोड यांची निवड

मंठा : सावकारग्रस्त शेतकरी समितीच्या महराष्ट्र संपर्कप्रमुखपदी किसनराव हेमला राठोड यांची निवड करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष बालासाहेब भाबट यांनी राठोड यांची निवड केली आहे. या निवडीचे जिल्ह्यात स्वागत केले जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे निवेदन

पारडगाव : महिलांच्या विविध प्रश्नासह इतर मागण्यांबाबत राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने पालकमंत्री राजेश टोपे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संगीता तडेकर यांच्यासह महिलांची उपस्थिती होती.

Web Title: Visual impairment camp