पंचायत समिती परिसरात वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:19 IST2021-06-30T04:19:48+5:302021-06-30T04:19:48+5:30

समितीच्या अध्यक्षपदी विजयसेनानी जालना : अहिर गवळी समाजाच्या अकराव्या सामूहिक विवाह समितीची बैठक ग्वालेश्वर महादेव मंदिरात घेण्यात आली. ...

Tree planting in Panchayat Samiti area | पंचायत समिती परिसरात वृक्षारोपण

पंचायत समिती परिसरात वृक्षारोपण

समितीच्या अध्यक्षपदी विजयसेनानी

जालना : अहिर गवळी समाजाच्या अकराव्या सामूहिक विवाह समितीची बैठक ग्वालेश्वर महादेव मंदिरात घेण्यात आली. सामूहिक विवाह समितीची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात अध्यक्ष तुलशीराम विजयसेनानी, कार्याध्यक्षपदी कन्हय्यालाल भगत, सेवकचंद नारियलवाले, महासचिवपदी मदन भुरेवाल, महिला अध्यक्षपदी चंदाबाई बटावाले यांचा समावेश आहे. बैठकीस मंगल मंडले, जीवनलाल बरेटिये, हिरालाल भुरेवाल, भोपनलाल भगत, ब्रह्मानंद जांगडे, भय्यालाल कडपेवाले आदी उपस्थित होते.

अकोला येथे वीज रोहित्र नादुरुस्त

जालना : तालुक्यातील अकोला येथील रोहित्र नादुरुस्त झाल्याने वीजपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. दरम्यान, अकोला येथील रोहित्र दुरुस्त करून बसविण्यात यावे, अशी मागणी महावितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्याकडे मनसेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली.

घनसावंगीत पावसामुळे दिलासा

घनसावंगी : प्रारंभी दमदार हजेरीनंतर तब्बल एक महिनाभर पावसाने उघडीप दिल्याने खरिपाची कोवळी पिके संकटात आली होती. मात्र, त्यानंतर मागील तीन ते चार दिवसांपासून तालुक्यातील काही भागांत जोरदार तर काही भागांत मध्यम ते हलका स्वरूपाचा पाऊस पडत असल्याने, पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Web Title: Tree planting in Panchayat Samiti area