शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

वीजबिलावर तोडगा काढण्यासाठी दहा ग्रामपंचायतींनी घेतला ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:36 IST

राणीउंचेगांव ३३ के.व्ही मधून तळेगांव, राठी अंतरवाली, चापडगांव, भुतेगांव, शिंदे वडगांव, राणीउंचेगांव, मानेपुरी, पानेगाव, दाई अंतरवाली, कृष्णनगर, गुरुपिंप्री, शेवगळ, ...

राणीउंचेगांव ३३ के.व्ही मधून तळेगांव, राठी अंतरवाली, चापडगांव, भुतेगांव, शिंदे वडगांव, राणीउंचेगांव, मानेपुरी, पानेगाव, दाई अंतरवाली, कृष्णनगर, गुरुपिंप्री, शेवगळ, पानेवाडी, निपानी पिंपळगाव, रवना भुतेगांव, मुढेगांव आदी २४ गावच्या परिसरातील ३५०० कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. महावितरणने कृषी पंपाचा विजपुरवठा खंडीत करण्याची मोहीम हाती आहे. त्यामुळे रब्बीतील गहू, हरभरा आदी पिके पाण्याअभावी धोक्यात आली आहेत. तर मोंसबी, द्राक्षे, डांळीब या फळबागा पाण्याअभावी धोक्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांची आर्थिक बाजू लक्षात घेवून कृषी पंपाच्या वसुलीमध्ये तोडगा काढून भरणा करुन घ्यावा यासाठी राणीउंचेगांव, राठी अंतरवाली, तळेगांव, शेवगळ, मानेपुरी, चापडगांव, गाढेसावरगांव, या ग्रामपंचायतने ठरावानुसार मागणी केली आहे. ठरावाची प्रत महावितरणचे उपकार्यकारी अभियंता मेश्राम यांना देण्यात आली आहे. यावेळी राणीउंचेगांवचे सरपंच विठ्ठल खैरे, राठी अंतरवालीचे सरपंच नकुल कंक, भगवान लोंढे, उध्दव माने, उमाजी लोंढे, गजानन झांबरे, शिंदे, शिवाजी डवणे, भानुदास लोंढे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

वीजबिले भरावीत

शेतकऱ्यांनी थकीत वीजबिलातील अर्धी रक्कम भरली तर अर्धे बील शासकीय योजनेनुसार माफ होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेवून थकीत वीज बिले भरावीत, असे आवाहन उपविभागीय अभियंता नागरे यांनी केले आहे.