विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:31 IST2021-02-16T04:31:55+5:302021-02-16T04:31:55+5:30

माेनिका शिवाजी गाडेकर (वय २६) असे मृत विवाहितेचे नाव आहे. मोनिका यांचा २०१७ मध्ये शिवाजी गाडेकर यांच्यासमवेत विवाह झाला ...

Suicide by strangulation of a married woman | विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

माेनिका शिवाजी गाडेकर (वय २६) असे मृत विवाहितेचे नाव आहे. मोनिका यांचा २०१७ मध्ये शिवाजी गाडेकर यांच्यासमवेत विवाह झाला होता. लग्नानंतर काही महिन्यांनी पती शिवाजी गाडेकर, सासरा भालचंद्र गाडेकर, सासू बेबीबाई गाडेकर यांनी खासगी बस घेण्यासाठी माहेरहून दहा लाख रुपये घेऊन ये म्हणून तगादा लावला होता. पैशांसाठी होणाऱ्या शारीरिक, मानसिक छळाला कंटाळून मोनिका गाडेकर यांनी रविवारी दुपारी राहत्या घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची तक्रार मृत विवाहितेची आई शिला प्रभाकर मोडके (रा. नांदुरा, जि. बुलढाणा) यांनी पारध पोलीस ठाण्यात दिली. या तक्ररीवरून पतीसह सासरा, सासूविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे.

===Photopath===

150221\15jan_1_15022021_15.jpg

===Caption===

फोटो मयत मोनिका शिवाजी गाडेकर

Web Title: Suicide by strangulation of a married woman