आष्टी येथे ग्रामस्थांचे रिकाम्या खुर्चीला निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:30 IST2021-02-13T04:30:15+5:302021-02-13T04:30:15+5:30

आष्टी : परतूर तालुक्यातील आष्टी येथील स्मशानभूमीवरील अतिक्रमण हटविण्यात यावे, अशी मागणी लिंगायत समाजाच्या वतीने ग्रामपंचायतीकडे करण्यात आली. परंतु, ...

Statement to the empty chair of the villagers at Ashti | आष्टी येथे ग्रामस्थांचे रिकाम्या खुर्चीला निवेदन

आष्टी येथे ग्रामस्थांचे रिकाम्या खुर्चीला निवेदन

आष्टी : परतूर तालुक्यातील आष्टी येथील स्मशानभूमीवरील अतिक्रमण हटविण्यात यावे, अशी मागणी लिंगायत समाजाच्या वतीने ग्रामपंचायतीकडे करण्यात आली. परंतु, ग्रामपंचायतीत कोणी नसल्याने ग्रामस्थांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्चीला निवेदन दिले.

यावेळी अजय ढेपे, रमेश उमरे, लक्ष्मण आवटी, अरुण डोईजडकर, विकी व्यवहारे, सुभाष रेणगाडे, ईश्वर भांडेकर, संजय थोरात, वैजनाथ रेणगाडे, कमल सवणे, मुकुंदा बनसोडे, गणेश साखरे, प्रशांत कापसे, अजय चौरे, गौरव उमरे, आकाश शेटे, राजेश राऊत, वैभव राजमाने, रमेश भांडेकर, आकाश सूर्यवंशी, शिवराज औटी, चंद्रकांत हरके, भारत रेनगाडे, लंकेश आवटी, मुंजा साखरे, राजेश उबाळे, विद्यानंद शेटे आदींची उपस्थिती होती. याबाबत ग्रामविकास अधिकारी नामदेव काळे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, परतूर येथे बैठकीला असल्यामुळे मी ग्रामपंचायतीत उपस्थित नव्हतो.

Web Title: Statement to the empty chair of the villagers at Ashti