शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

"फडणवीस साहेब, तोंडग्यासाठी बैठक बोलवता, की मराठ्यांविषयी द्वेष ओकायला": मनोज जरांगे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2024 18:21 IST

फडणवीस साहेब, तुम्हाला हे राज्य रक्तबंबाळ करायचं आहे का? मनोज जरांगे यांचा संतापजनक सवाल 

- पवन पवार

वडीगोद्री( जालना): फडणवीस साहेब, तुम्ही नेमकी तोडगा काढायला बैठक बोलवता, की मराठ्यांविषयी द्वेष ओकायला, तुम्हाला राज्य रक्तबंबाळ करायचे आहे का? असा सवाल मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला. त्यांनी अंतरवाली सराटी येथे आज दुपारी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

जरांगे पुढे म्हणाले, फडणवीस साहेब, तुम्हाला हे राज्य रक्तबंबाळ करायचं आहे का ? नेमकी तुमचं काय चाललं हेच कळत नाही. आमच्या सगेसोयऱ्यांना मराठ्यांना त्रास द्यायचा. फडणवीस साहेब, तुमचे पण सोयरे आहे राज्यात. आम्ही त्रास देत नाही त्यांना. एवढा मोठा उच्च दर्जाचा भाजपचा नेता मराठ्यांविषयी डाव करतोय. मला तर फडणवीस साहेबांच आश्चर्य वाटायला लागलय. मराठा समाजाला गोड गोड बोलायचं अन् ओबीसी नेते मराठ्यांच्या अंगावर घालायचे, असा फडणवीस साहेबांचा डाव दिसतोय.  फडणवीस यांनी इतके 'छिछोरे'  चाळे का करायला पाहिजे, एवढ्या मोठ्या नेत्यांने महाविकास आघाडीची आणि महायुतीची बैठक लावली होती. तेव्हा पासून सगळे विरोधात बोलायला लागले. फडणवीस साहेब तुमचं काय चाललंय मला काही कळत नाही,परत म्हणता मला टार्गेट केल जात. तूम्ही वागतात तसे. तुमच्या बैठकीला आलेले नेते, मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलतात. आज आमच्यावरच वेळ आली आहे फडणवीस साहेब. एक महिन्याचा वेळ आम्ही त्यांना दिला होता, पण २० जुलै रोजीपासून बेमुदत उपोषण करण्याची आमच्यावर वेळ आलेली आहे. यावेळी उपोषण कठोर करणार आहे.

मराठ्यांची एससी एसटीच्या आरक्षणाची मागणीच नाहीप्रकाश आंबेडकर साहेब, प्रत्येक वेळी मार्ग सांगायचे, तुम्हाला सलाईनमधून विष घालतील म्हणायचे, तेच आज इतकं शॉकिंग वागत आहेत. आंबेडकर साहेब पण म्हणाले सगेसोयऱ्याची अंमलबजावणी करू नका, त्यांचा पक्ष म्हणतो की नोंदी रद्द करा. मराठ्यांची एससी एसटीच्या आरक्षणाची मागणीच नाही, असही जरांगे पाटील म्हणाले. तसेच ओबीसीच्या सर्व नेत्यांना आणि प्रकाश आंबेडकर साहेबांना सगळ्यांनाच कळकळीने बोलतोय फडणवीस साहेब माणूस विचित्र दिसतोय मला आपण गरिबांसाठी लढू, त्यांच्या फाश्यात फासून गोरगरीब जनतेला काहीच मिळणार नाही माझी खरंच विनंती आहे, गोरगरीब मराठ्यांना गोरगरीब दलितांना आपण एकत्र आल पाहिजे, आपण आपल्यालाच न्याय देऊ शकतो. विधानसभेला एकत्र यायला पाहिजे का यावर बोलताना जरांगे म्हणाले की, येणार आहे का नाही मला माहित नाही. आम्ही त्यांना विरोधक मानलं नाही. आताची वक्तव्य बघितली तर गरिबांना कसा न्याय मिळणार. न्याय देण्यासाठी एकत्र यावं लागेल.ते बोलायला तयार नाही, अंमलबजावणी रद्द करा म्हणतात हे अपेक्षीत नाही आम्हाला.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालना