मस्तगड येथे दुकानाला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:57 IST2021-03-04T04:57:53+5:302021-03-04T04:57:53+5:30

मस्तगड जुना जालना येथे संजय निवृत्ती कदम यांचे व्यंकटेश ऑटो पार्टसचे दुकान आहे. या दुकानाला सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक ...

Shop at Mastgad on fire | मस्तगड येथे दुकानाला आग

मस्तगड येथे दुकानाला आग

मस्तगड जुना जालना येथे संजय निवृत्ती कदम यांचे व्यंकटेश ऑटो पार्टसचे दुकान आहे. या दुकानाला सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. नागरिकांची याची माहिती अग्निशमन विभागाला दिली. माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. मात्र तोपर्यंत दुकानातील साहित्य जळून खाक झाले होते. यात १७ लाख रूपयांचे नुकसान झाल्याची माहिती दूकान मालक संजय कदम यांनी दिली.

आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे संतोष काळे, नितेश ढाकणे, दत्ता मोरे, विठ्ठल कांबळे, अशोक गाढे, रवि तायडे, विनायक चव्हाण, रवी बनसोडे आदींनी प्रयत्न केला. जालना शहराचे तलाठी अनिल पाटील यांनी दुकानाची पाहणी करून पंचनामा केला.

Web Title: Shop at Mastgad on fire