शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

१९ हजार शेतकऱ्यांना वीज वितरणाचा 'शॉक'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:36 IST

जालना : महावितरण कंपनीने शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाच्या वसुलीसाठी ५० टक्के सवलत याेजना लागू करून वीजपुरवठा खंडित करण्याचा धडाका लावला ...

जालना : महावितरण कंपनीने शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाच्या वसुलीसाठी ५० टक्के सवलत याेजना लागू करून वीजपुरवठा खंडित करण्याचा धडाका लावला आहे. तालुक्यातील १९ हजार कृषिपंपांची वीज तोडण्यात आली असून, त्यामुळे हजारो हेक्टरवरील रब्बीची पिके धोक्यात आली आहेत.

यापूर्वी अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले. रब्बीतील गहू, हरभरा आदी पिके चांगली आली आहेत, तर मोसंबी, द्राक्ष, पेरू, अंबा आदी फळबागाही फुलल्या आहेत. शेतकऱ्यांच्या हाती काही दिवसांत ही पिके येणार आहेत. परंतु, महावितरणने थकीत वीजबिल वसुलीसाठी चक्क वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेतली आहे. मोसंबीच्या बागेला पाणी दिले नाही तर मोसंबीची फुलगळ, गुंडीगळ होऊन शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार आहे. शासनस्तरावरून या बाबींचा गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे. हरभरा घाटे अवस्थेत तर गहू लोंब्या अवस्थेत आहे. वेळेवर पाणी मिळाले नाही तर येथेही उत्पादनामध्ये घट होणार आहे.

तालुक्यात ३३ केव्हीचे १४ व १३२ केव्हीचे चार उपकेंद्र आहेत. या उपककेंद्रांतून शेतीला वीजपुरवठा केला जातो. वीजबिलापोटी आजवर १९ हजार कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे.

मोहीम सुरूच राहणार

आजवर जवळपास १९ हजार कृषिपंपांची वीजतोडणी करण्यात आली आहे. थकीत वीजबिलाच्या वसुलीसाठी उर्वरित दिवसांत आणखी वीजजोडणी कट केली जाणार आहे. शेतकऱ्यांनी थकीत वीजबिले भरून योजनेचा लाभ घ्यावा.

व्ही.एस. कुलकर्णी

उपकार्यकारी अभियंता, जालना ग्रामीण