शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

बोले..सोनिहालचा जालन्यात जयघोष..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 00:09 IST

जालना : गुरूनानक देव यांच्या ५५० व्या जयंती निमित्त जालना शहरात गेल्या आठवडाभरापासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले ...

ठळक मुद्देभव्य मिरणूक : चित्तथरारक प्रात्याक्षीक

जालना : गुरूनानक देव यांच्या ५५० व्या जयंती निमित्त जालना शहरात गेल्या आठवडाभरापासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सिंधी पंचायत भवन आणि जुना जालन्यातील गणपती गल्लीस्थित गुरूव्दारामध्ये गुरूग्रंथ साहेब या ग्रंथाचे सामूहिक पठण करण्यात आले.मंगळवारी सकाळी सिंधी पंचायत भवन जवळून गुरूग्रंथ साहेब ग्रंथाची सजविलेल्या रथातून मिरणूक काढण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणावर शीख, सिंधी तसेच पंजाबी खत्री बांधवांची उपस्थिती होती.सकाळी नऊ वाजता निघालेल्या या मिरणूकीच्या स्वागतासाठी जालना शहर सजले होते. मिरणूक ज्या भागातून जाणार होती, तेथे सडा-रांगोळ्या काढून फुलांचा वर्षाव करून स्वागत करण्यात येत होते. यावेळी पंचप्यारे या धर्मगुरूंचेही अनेक भाविक मनोभावे दर्शन घेतांना दिसून आले. मिरणूक शहराच्या विविध प्रमुख भागातून काढण्यात आली. बोले सोनिहाल..., संत श्रीयाकाल..., गुरूनानक देव की, जय. या घोषणांनी शहरात भक्तीमय वातावरण झाले होते. मिरणूकीनंतर महाप्रसाद-लंगरचे आयोजन करण्यात आले होते.जुना जालना भागातील गुरूव्दारामध्येही सकाळपासून पंजाबी खत्री बांधवानी दर्शनासाठी गर्दी केली होती. या निमित्त विशेष पूजेचे आयोजन करून नंतर प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. गुरूनानक जयंती निमित्त गुरूव्दारावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. गुरूनानक जयंतीनिमित्त अन्नदानही करण्यात आले.

टॅग्स :JalanaजालनाReligious programmeधार्मिक कार्यक्रम