शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
2
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
3
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
4
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
5
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
6
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
7
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
8
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
9
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
10
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
11
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
12
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
13
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
14
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
15
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
16
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
17
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
18
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
19
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
20
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
Daily Top 2Weekly Top 5

चोरीच्या दुचाकींची कर्जाचे हप्ते थकलेल्या सांगून विक्री; पाच आरोपींना अटक, चौदा दुचाकी जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 15:19 IST

बुलडाणा आणि औरंगाबाद जिल्ह्यांतून साथीदारांच्या मदतीने चौदा दुचाकी चोरल्याचे आरोपींनी सांगितले.

ठळक मुद्देभोकरदन तालुक्यातील पारध पोलिसांनी दुचाकी चोरट्यांची टोळी पकडली 

पारध (जि. जालना) : भोकरदन तालुक्यातील पारध पोलीस ठाण्यात नव्याने रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत मोरे व त्यांच्या पथकाने दुचाकी चोरट्यांची टोळी जेरबंद केली आहे. या चोरट्यांकडून चोरीच्या १४ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

भोकरदन तालुक्यातील शेखर ऊर्फ अण्णा प्रकाश दांडगे (रा. पिंपळगाव रेणुकाई), विलास रामभाऊ कुऱ्हाडे (रा. हिसोडा), श्रीराम ऊर्फ बंडू शैलेंद्र जोनवाल (रा. लेहा), तेजराव ऊर्फ बाबा रामदास जाधव (रा. पिंपळगाव रेणुकाई) आणि गजानन फकिरचंद गोठवाल (रा. जळगाव सपकाळ) या सर्व आरोपींना दुचाकी चोरी प्रकरणात औरंगाबाद विशेष गुन्हे शाखेने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यांनी चोरलेल्या चौदा दुचाकींपैकी नऊ गाड्यांना नंबरप्लेट नाही. या चोरट्यांना २५ मार्च ते ३१ मार्च दरम्यान ताब्यात घेतले असून, २० मार्च रोजी या पाचही आरोपींविरोधात पारध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ३१ मार्चपर्यंत चोरून विक्री केलेल्या दुचाकी जप्त करण्याची प्रक्रिया सुरू होती.

ही कारवाई पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, भोकरदनचे उपविभागीय पोलीस अधिकारी इंदल बहुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत मोरे, पोलीस नाईक बी. एम. चौधरी, प्रकाश सिनकर, प्रदीप सरडे, सागर देवकर, शिवाजी जाधव, विकास जाधव, सुरेश पडोळ, दिनेश पायघन, नागरे, वाघ, खरात, रानगोते, भालके, टेकाळे, खेडेकर, महिला पोलीस अंमलदार रिठ्ठे यांच्या तपास पथकाने केली.

बँकेने ओढून आणलेल्या गाड्या म्हणून करायचे विक्रीपारध पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत मोरे यांनी या आरोपींची चौकशी केली असता, पारध पोलीस ठाण्याच्या हद्दीसह लगतच्या बुलडाणा आणि औरंगाबाद जिल्ह्यांतून साथीदारांच्या मदतीने चौदा दुचाकी चोरल्याचे आरोपींनी सांगितले. या गाड्या बँकेने ओढून आणलेल्या आहेत, त्या आम्ही कमी किमतीत देतो आणि गाड्यांचे कागदपत्र नंतर आणून देतो, असे खोटे बोलून खेड्यापाड्यातील लोकांना गाड्यांची विक्री करायचे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalanaजालना