रिसालाची कार्यकारिणी गठीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2020 12:09 AM2020-03-03T00:09:04+5:302020-03-03T00:09:14+5:30

होलिका उत्सवाची परंपरा यंदाही तेवढ्याच उत्साहाने साजरी करण्यासाठी हत्ती रिसाला समितीची बैठक नुकतीच पार पडली.

Risala committee formed | रिसालाची कार्यकारिणी गठीत

रिसालाची कार्यकारिणी गठीत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : येथील होलिका उत्सवाची परंपरा यंदाही तेवढ्याच उत्साहाने साजरी करण्यासाठी हत्ती रिसाला समितीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत नूतन कार्यकारिणीचे गठण करण्यात आले. यात अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते अंकुश राऊत, कार्याध्यक्ष सुभाष देविदान, सरचिटणीस रमेश गोरक्षक यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
१३१ वर्षापासून जालना शहरात धुलीवंदनाच्या दिवशी हत्ती रिसाला समितीची मिरवणूक काढण्यात येते. ज्या भागातून ही मिरवणूक मार्गक्रमण करते त्या भागातील रंग खेळणे थांबविण्याची परंपरा आहे. रंगारखिडकी येथून ही मिरवणूक काढण्यात येते. मिरवणुकीत हत्तीवर बसलेला राजा हा रेवड्या आणि साखर फुटाणे उधळतो. त्यानंतर रंगखेळणे बंद होते. यानिमित्त विविध हस्य कवी आपल्या खुमासदार शैलीत रंगारखिडकी येथून कार्यक्रम सादर करतात. ओला रंग खेळण्याऐवजी गुलाल खेळण्याचे आवाहन पर्यावरणकडून केल्याने आता ही पध्दत येथे अवलंबली जात आहे.
या कार्यकारिणीतील अन्य पदाधिकाऱ्यांमध्ये कोषाध्यक्ष दिगंबर पेरे, उपाध्यक्ष ओम भारूका, हरीभाऊ देविदान, राधेश्याम जैस्वाल, दुर्गैश कठोठीवाले, गोविंदप्रसाद मुंदडा, श्याम लोया, इकबाल पाशा, शेख महेमूद, विजय पंडित, गोपाल अग्रवाल, संजय दाड, हिरालाल पिपरीये, गोविंद गाजरे, सूर्यकांत पवार, सखाराम मिसाळ, डॉ. जनार्धन शहाणे, भगवानराव सिंधदनकर यांचा समावेश आहे. मार्गदर्शक म्हणून जिल्ह्यातील अनेक मान्यवरांची निवड करण्यात आली आहे. तर सदस्यांमध्येही शहरातील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणा-यांना स्थान देण्यात आले आहे.

Web Title: Risala committee formed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.