फेरीवाल्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी तत्पर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:33 IST2021-02-09T04:33:32+5:302021-02-09T04:33:32+5:30

जालना : शहरातील फेरीवाल्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण तत्पर असून, पंतप्रधान स्वनिधी योजनेत येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या ...

Ready to solve peddlers' problems | फेरीवाल्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी तत्पर

फेरीवाल्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी तत्पर

जालना : शहरातील फेरीवाल्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण तत्पर असून, पंतप्रधान स्वनिधी योजनेत येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जातील, अशी ग्वाही आ. कैलास गोरंट्याल यांनी दिली.

शहरातील गांधी चमन भागात सोमवारी दुपारी महात्मा फुले हॉकर्स युनियनच्या वतीने राज्यस्तरीय मेळावा घेण्यात आला. यावेळी आ. गोरंट्याल बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सगीर अहेमद रजवी यांची उपस्थिती होती. प्रारंभी संतोष लमकाने यांनी फेरीवाल्यांच्या असलेल्या अडचणी मांडल्या. नगर परिषदेने फेरीवाले व्यवसाय करीत असलेल्या ठिकाणी परवानगी द्यावी, आत्मनिर्भर स्वनिधी योजनेतील अडचणी सोडवाव्यात, यासह इतर प्रश्न यावेळी मांडण्यात आले. यावेळी आ. गोरंट्याल यांनी फेरीवाल्यांचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंडित जाधव यांनी केले, तर आभार हारुण फुलारी यांनी मानले.

यावेळी सीमा लामकाने, सुनीता जाधव, गंगूबाई वानखेडे, सुनीता वानखेडे, जनाबाई मालोदे, हारुण फुलारी, विजय सांगळे, हारीश आनंद, योगेश चिरखे, पंडित जाधव, मनोज रत्नपारखे, शेख अमजद, संतोष राऊत, शेख मुख्तार, शेख मोबीन, उद्धव ठाकर, राम गडकरी, दीपक मालोदे, शेख रईस, बेबीबाई इंगळे, संजय औरंगे, शैलेंद्र जोगदंड, अरुण जाधव, रमेश वानखेडे, हरीश आनंद, आनंद फुलारी यांच्यासह फेरीवाल्यांची उपस्थिती होती.

फोटो स्कॅन

Web Title: Ready to solve peddlers' problems