प्रारूप मतदार याद्यांची नगर पंचायतीत प्रसिध्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:31 IST2021-02-16T04:31:38+5:302021-02-16T04:31:38+5:30

विजेसाठी भाजपचा आंदोलनाचा इशारा जालना : थकीत वीजबिलापोटी कृषी पंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा निर्णय महाविकास आघाडी शासनाने घेतला आहे. ...

Publication of draft voter lists in Nagar Panchayat | प्रारूप मतदार याद्यांची नगर पंचायतीत प्रसिध्दी

प्रारूप मतदार याद्यांची नगर पंचायतीत प्रसिध्दी

विजेसाठी भाजपचा आंदोलनाचा इशारा

जालना : थकीत वीजबिलापोटी कृषी पंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा निर्णय महाविकास आघाडी शासनाने घेतला आहे. शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. त्यामुळेे शासनाने हा निर्णय त्वरित मागे घ्यावा, अन्यथा भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा आमदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष संतोष दानवे यांनी दिला आहे.

अध्यक्षपदी हारेर, उपाध्यक्षपदी गिल्डा यांची निवड

शहागड : येथील व्यापारी महासंघाच्या अध्यक्षपदी धर्मराज हारेर यांची फेरनिवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी महेश गिल्डा, जफर तांबोळी, सचिवपदी दानिश कुरेशी यांची निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्ष हस्तीमल बंब, सचिव प्रवीण मेहता यांनी पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र दिले. यावेळी मारूफ फुलारी, विनायक शिंदे, अन्सार कुरेशी, दत्तात्रय मार्गे, मोहसीन तांबोळी, प्रमोद मोहिते, ज्ञानेश्वर उदावंत आदींची उपस्थितती होती.

अध्यक्षपदी बोबडे तर उपाध्यक्षपदी टेकाळे

तीर्थपुरी : येथील व्यापारी महासंघाच्या अध्यक्षपदी संतोष बोबडे व उपाध्यक्षपदी दत्ता टेकाळे यांची निवड करण्यात आली आहे. कार्यकारिणीत सचिवपदी सतीश तापडिया, सहसचिवपदी राजेंद्र चिमणे, महिला अध्यक्षपदी रूख्मिणबाई वाघ, सचिवपदी सुनीता चिमणे, सहसचिवपदी मयुरी खरात यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष हस्तीमल बंब यांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली. निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

खराब रस्त्यामुळे अपघाताचा धोका

भोकरदन : तालुक्यातील राजूर ते फुलंब्री मार्गावरील नाल्याच्या जवळ मोठा खड्डा पडला आहे. या खड्ड्यामुळे दुचाकींचे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. शिवाय इतर काही ठिकाणीही हा रस्ता धोकादायक बनला आहे. त्यामुळे बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन एखादा मोठा अपघात होण्यापूर्वी राजूर ते फुलंब्री मार्गाची तत्काळ दुरूस्ती करावी अशी मागणी या भागातील नागरिक, वाहन चालकांसह प्रवाशांमधून केली जात आहे.

Web Title: Publication of draft voter lists in Nagar Panchayat