पीरपिंपळगाव येथे प्रभात फेरीचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:59 IST2021-02-05T07:59:46+5:302021-02-05T07:59:46+5:30

जालना : तालुक्यातील पीरपिंपळगाव येथे पोखरा सूक्ष्म नियोजन प्रक्रिया कार्यक्रमांतर्गत पाणी, माती व पीक व्यवस्थापनाचे महत्त्व समजण्यासाठी प्रभात फेरीचे ...

Prabhat Feri organized at Pirpimpalgaon | पीरपिंपळगाव येथे प्रभात फेरीचे आयोजन

पीरपिंपळगाव येथे प्रभात फेरीचे आयोजन

जालना : तालुक्यातील पीरपिंपळगाव येथे पोखरा सूक्ष्म नियोजन प्रक्रिया कार्यक्रमांतर्गत पाणी, माती व पीक व्यवस्थापनाचे महत्त्व समजण्यासाठी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी एन. आर. कोकाटे यांनी मृदसंधारण व पाणी नियोजन तसेच व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले. यानंतर इतर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी उपविभागीय कृषी अधिकारी एन.आर.कोकाटे, कृषी अधिकारी नित्यानंद काळे, तालुका कृषी अधिकारी एस.एन.गाडे, मंडळ कृषी अधिकारी जी.आर.पौळ यांची प्रमुख उपस्थिती होती. कृषी सहायक एस.एस. कमाणे यांनी पाण्याचे महत्त्व पटून दिले. यावेळी गावात प्रभातफेरी काढण्यात आली होती.

या कार्यक्रमाला पंचायत समितीचे सदस्य के.टी. खिल्लारे, सरपंच के.ए. कोरडे, सतीश कमाने, पी.के. बनसोडे, डी.एल. वाघ, बी.इन.कोलते, राम बावणे, एस. एन. कोल्हे, डी.एच. मगर, धनंजय बावणे, अजित खिल्लारे, गोकुळ खिल्लारे, अमोल खिल्लारे, विष्णू महाराज, सतीश मुसळे आदींची उपस्थिती होती.

---------------------------------------

Web Title: Prabhat Feri organized at Pirpimpalgaon