शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
4
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
5
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
7
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
8
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
9
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
10
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
11
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
12
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
13
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
14
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
15
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
16
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
17
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
18
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
19
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
20
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
Daily Top 2Weekly Top 5

लोकवर्गणीतून घेणार शाळेसाठी जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:27 IST

टेंभुर्णी : शाळेतील मुलं देशाचे भवितव्य घडविणारी असतात, ही बाब लक्षात घेऊन डोलखेडा खुर्द (ता. जाफराबाद) येथील ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून ...

टेंभुर्णी : शाळेतील मुलं देशाचे भवितव्य घडविणारी असतात, ही बाब लक्षात घेऊन डोलखेडा खुर्द (ता. जाफराबाद) येथील ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून शाळेसाठी जमीन घेण्याचा निर्णय घेतला आहे. जुन्या शाळेची झालेली दुरवस्था आणि अपुरी जागा, यामुळे रविवारी शाळेत बैठक घेण्यात आली. या बैठकीत शाळेसाठी लागणारी एक एकर जमीन घेण्यासाठी लोकवर्गणी करण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला.

जाफराबाद तालुक्यातील डोलखेडा खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेच्या विकासासाठी ग्रामस्थ सरसावले आहेत. गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. सद्यस्थितीत शाळेची इमारत अतिशय जीर्ण झाली आहे. ही शाळा गावाच्या मध्यभागी आल्याने अनेक समस्यांंच्या निर्माण झाल्या आहेत. शाळेच्या समोरच गावचा पार असल्याने नेहमीच येथे वर्दळ असते. त्यामुळे प्रयत्न करूनही येथे शैक्षणिक वातावरण तयार होण्यास अडथळे येतात. यासाठी गावातून शाळा स्थलांतर करण्याचा विचार पुढे आला. या पार्श्वभूमीवर रविवारी शाळेत पालक मेळावा झाला. यावेळी ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून शाळेसाठी एक एकर जागा विकत घेण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. या पालक मेळाव्यात गटसाधन केंद्राचे साधन व्यक्ती नारायण पिंपळे, शिक्षक नसीम शेख यांनी ग्रामस्थांचे उद्बोधन केले. यावेळी गावचे आजी-माजी सरपंच, उपसरपंच, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकांसह पालकांची उपस्थिती होती.

निधी संकलनास प्रारंभ

शाळेला लागणाऱ्या जमिनीसाठी निधी संकलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. निर्णय घेऊन न थांबता लगेचच निधीचे संकलनही सुरू करण्यात आले आहे. यासाठी विविध ठिकाणी शासकीय सेवेत असलेल्या गावच्या अधिकारी, कर्मचारी यांचे सहकार्य घेतले जाणार असून, गावातील प्रत्येक उंबरठ्याकडून लोकवर्गणी घेतली जाणार आहे.