एकास सहा जणांकडून मारहाण; चाकूने वार करून केले जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:29 IST2021-02-13T04:29:46+5:302021-02-13T04:29:46+5:30

लालबाग येथील फिर्यादी मोहसीन खान सुलतान खान यांचे काका व आरोपींमध्ये भांडणे झाली होती. माझ्या काकासोबत भांडण का ...

One beaten by six men; Wounded by a knife | एकास सहा जणांकडून मारहाण; चाकूने वार करून केले जखमी

एकास सहा जणांकडून मारहाण; चाकूने वार करून केले जखमी

लालबाग येथील फिर्यादी मोहसीन खान सुलतान खान यांचे काका व आरोपींमध्ये भांडणे झाली होती. माझ्या काकासोबत भांडण का केले, असे फिर्यादी विचारण्यासाठी गेला असता, आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादीस शिवागाळ केली. तौफिक खान आसीफ खान याने मोहसीन खान यांच्या मानेवर जोरात चाकू मारून गंभीर जखमी केले. आसेफ खान आलियार खान याने फिर्यादीच्या डोक्यात लाकडी दांड्याने मारून जखमी केले. फिर्यादी मोहसीन खान सुलतान खान यांच्यावर जालना येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, पोलीस निरीक्षक संजय देशमुख, पोलीस उपनिरीक्षक झलवार यांनी घटनास्थळाला भेट दिली. याप्रकरणी मोहसीन खान सुलतान खान यांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोउपनि. झलवार करीत आहेत.

मुलांच्या भाडणांवरून एकास मारहाण

जालना : लहान मुलांच्या भांडणाचे कारण करून तिघांनी एकास मारहाण केल्याची घटना गुरुवारी रात्री जालना शहरातील रामनगर येथे घडली. याप्रकरणी मनोज प्रमोद शिंदे यांच्या फिर्यादीवरून एक महिला, सोनू प्रदीप जाधव (रा. रामनगर, जालना), रवी पूर्ण नाव माहिती नाही यांच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ. पवार करीत आहेत.

Web Title: One beaten by six men; Wounded by a knife