शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

राहेयाच्या कामांचे उद्दिष्ट सर्व यंत्रणांनी पूर्ण करावे : आयुक्त चंद्राकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:36 IST

चंद्राकार यांच्या उपस्थितीत मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी कृषी. वनविभाग तसेच रेशीम विभागासह सामाजिक ...

चंद्राकार यांच्या उपस्थितीत मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी कृषी. वनविभाग तसेच रेशीम विभागासह सामाजिक वनीकरण विभागातील अधिकारी हजर होते. प्रारंभी रोजगार हमी योजनेचे येथील उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध कामांची माहिती देऊन पुढील नियोजन केले असल्याचे सांगितले.

जालना जिल्ह्यात जवळपास २४३ ग्रामपंचायतीत ९९१ कामे सुरू असून, त्यात ९ हजार ७५ मजुरांची उपस्थिती आहे. सर्वात जास्त उपस्थिती ही कृषी तसेच वनिकरण विभागात असून, रोपवाटीकेतील रोपांची निगा राखण्यासह अन्य कामांचा समावेश आहे. आता जवळपास प्रत्येक मजुराचे ऑनलाइन बँक खाते असल्याने त्यांना शासनाने ठरवून दिलेला सरसरी २०० रुपये रोज या प्रमाणे मोबदला देण्यात येत असल्याचे परळीकर यांनी सांगितले. वैयक्तिक लाभाच्या सिंचन विहिरींची जवळपास ६००पेक्षा अधिकची कामे सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

सध्या शेतातील कामे कुठलीच नसल्याने रोजगार हमी योजनेवर ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर मजूर येत आहेत. त्यांच्या मागणीनुसार कामे देण्यासाठीचे नियोजन जिल्हा परिषदेने दिलेल्या आराखड्यानुसार करण्यात आले आहे. या आढावा बैठकीस सर्व आवश्यक यंत्रणांचे विभागप्रमुख आणि कर्मचारी हजर होते.

चौकट

वृक्षलागवडीवर भर

रोजगार हमी योजनतून अपूर्ण असलेली कामे प्राधान्याने पूर्ण करावीत. तसेच माझे गाव सुंदर गाव या योजनेतून गावातील मोकळ्या जागेत जास्तीत जास्त वृक्षलागवड करून पर्यावरण संरक्षणास हातभार लावण्याची गरजही आयुक्त चंद्रकार यांनी या बैठकीत व्यक्त केली. राज्य सरकारची शरद पवार ग्राम समृद्धा योजनेअंतर्गत पशुपालनासह गाय, म्हैस यांच्यासाठी गोठे बांधणे कुक्कुटपालनाला चालना देणे आदी कामे या योजनेतून पूर्ण करता येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.