जिल्ह्यात वाढतेय कोरोनाची रुग्णसंख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:30 IST2021-02-13T04:30:17+5:302021-02-13T04:30:17+5:30

जालना : कोविड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एकाचा शुक्रवारी मृत्यू झाला. तर शुक्रवारीच ४५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. २६ ...

The number of corona patients is increasing in the district | जिल्ह्यात वाढतेय कोरोनाची रुग्णसंख्या

जिल्ह्यात वाढतेय कोरोनाची रुग्णसंख्या

जालना : कोविड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एकाचा शुक्रवारी मृत्यू झाला. तर शुक्रवारीच ४५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. २६ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यातील बाधितांची संख्या १४ हजार ६० वर गेली असून, आजवर ३७४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत १३ हजार ४५६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान, जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे.

जालना शहरातील २५, तर तालुक्यातील दरेगाव १, केदारखेडा १, सेवली येथील एकास कोरोनाची लागण झाली. मंठा तालुक्यातील गोळखंड तांडा १, वैद्य वडगाव येथील एकास कोरोनाची बाधा झाली. घनसावंगी तालुक्यातील शिंदे वडगाव १, राजेगाव येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. बदनापूर तालुक्यातील दाभाडी १, बदनापूर १, उज्जैनपुरी १, चणेगाव येथील एकास कोरोनाची लागण झाली. जाफराबाद शहरातील २, तर तालुक्यातील बोरी येथील दोघांना कोरोनाची बाधा झाली. भोकरदन शहरातील १, इतर जिल्ह्यातील बुलडाणा ३, औरंगाबाद येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

१२ दिवसांत सर्वाधिक रुग्ण शुक्रवारी

मागील १२ दिवसांत शुक्रवारी सर्वाधिक ४५ रुग्ण निघाले आहेत. त्यातच मागील तीन दिवसांपासून रुग्णांची संख्या वाढत आहे. १० फेब्रुवारी रोजी ३२, ११ फेब्रुवारी ४४, तर १२ फेब्रुवारी रोजी ४५ रुग्ण निघाले आहेत. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता नागरिकांनी सतर्क होण्याची गरज आहे. रुग्णसंख्या वाढत असली तरी मृत्यूचे प्रमाण कमी आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

मागील सहा दिवसात वाढलेली रुग्णसंख्या

दिवस पॉझिटिव्ह

७ फेब्रुवारी २९

८ फेब्रुवारी २०

९ फेब्रुवारी ३९

१० फेब्रुवारी ३२

११ फेब्रुवारी ४४

१२ फेब्रुवारी ४५

Web Title: The number of corona patients is increasing in the district