आता आषाढातही शुभमंगल सावधान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:24 IST2021-07-17T04:24:11+5:302021-07-17T04:24:11+5:30

जालना : हिंदू धर्मात शुभ कार्य करण्यासाठी शुभ मुहूर्त पाहिला जातो. विवाह सोहळ्यामध्ये शुभ मुहूर्ताची तर आवर्जून खातरजमा ...

Now, even in hope, good luck, beware! | आता आषाढातही शुभमंगल सावधान !

आता आषाढातही शुभमंगल सावधान !

जालना : हिंदू धर्मात शुभ कार्य करण्यासाठी शुभ मुहूर्त पाहिला जातो. विवाह सोहळ्यामध्ये शुभ मुहूर्ताची तर आवर्जून खातरजमा केल्यावरच लग्नसोहळा निश्चित केला जातो. कारण लग्न हे आयुष्यभराचे नाते असते. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आणि लग्नकार्य लांबणीवर पडले आहे.

त्यामुळे आता आत्पकालीन काळासाठी वेगळे मुहूर्त असणाऱ्या आषाढातही लग्नकार्ये होत आहेत. भौगोलिकद्दष्ट्या पूर्वी आषाढ महिन्यात पर्जन्यकाळ असल्याने अंगणात लग्न करणे कठीण होते. तसेच प्रवासाची साधने त्या काळी उपलब्ध नसणे, यामुळे लग्न मुहूर्त दिले जात नव्हते, असे सांगण्यात आले. मात्र, आता लग्न मंगल कार्यालयात होतात व प्रवासही सुखकर झाला आहे. त्यामुळे पंचांग कालातील मुहूर्तासह आपत्कालीन कालासाठी वेगळे मुहूर्त दिले जात आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंडितांकडून असे मुहूर्त काढून दिले जात आहेत. सध्या जिल्ह्यात आषाढातही मोठ्या प्रमाणात लग्न सोहळे होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

परवानगी ५० चीच

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वधू व वराकडील मिळून ५० माणसे लग्न सोहळ्याला उपस्थित राहण्याची शासनाने परवानगी दिली आहे. मास्कचा वापर, सॅनिटायझर वापरणे व सुरक्षित अंतर ठेवणे, या नियमांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे बरेच लग्न घरी किंवा सभागृहात होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

कोरोनामुळे घरीच होतात लग्नसोहळे

n ऐन लग्नसराईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ठरलेली बरीच लग्न या ना त्या कारणाने पुढे ढकलावी लागली.

n आता कमी लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळे होत असल्याने काहीजण घरीच लग्न सोहळे उरकून घेत आहेत.

Web Title: Now, even in hope, good luck, beware!