युवकांना व्यसनाच्या जोखड्यातून बाहेर काढण्याची गरज -बल्लाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:27 IST2021-02-08T04:27:12+5:302021-02-08T04:27:12+5:30

अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथील श्री गुरुदेव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर शाळेत आयोजित कार्यक्रमात शनिवारी १० वी व १२ ...

The need to get the youth out of the yoke of addiction - Ballal | युवकांना व्यसनाच्या जोखड्यातून बाहेर काढण्याची गरज -बल्लाळ

युवकांना व्यसनाच्या जोखड्यातून बाहेर काढण्याची गरज -बल्लाळ

अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथील श्री गुरुदेव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर शाळेत आयोजित कार्यक्रमात शनिवारी १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी मुख्याध्यापक जे.आर. पुनवटकर, पोलीस कर्मचारी महेश तोटे, गजानन अवचार, पर्यवेक्षिका जे.डब्ल्यू. दांडगे, जे.आर. गावडे, ए.एम. साळुंखे, प्रदीप थोरात, कीर्तिनंद गांगुर्डे, हरी गावडे आदींची उपस्थिती होती.

पुढे बोलताना बल्लाळ म्हणाले की, शालेय जीवनात विद्यार्थ्यांना विविध गोष्टींचे आकर्षण असते. मुलींना कोणी त्रास देत असेल तर त्यांनी याद राखा. मुलींनी शिक्षण घेताना कोणत्याही प्रकारची भीती वाटू देऊ नये. तसा काही त्रास झाला तर त्याची तक्रार करावी. त्यानंतर त्या गुन्हेगारांवर पोकसा कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल. न्यायालयात सुद्धा फक्त मुलीचे व तिच्या पालकांचे म्हणणे ग्राह्य धरण्यात येते. कायदा हा मुलीच्या बाजूने आहे. त्यामुळे मुलींनी घाबरून जाण्याचे काही कारण नाही. विद्यार्थ्यांनी आपले लक्ष फक्त अभ्यासावर केंद्रित केले पाहिजे. अभ्यास करा अन् जीवनाचे राजे व्हा, असेही त्या म्हणाल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए.जी. खांडेभराड यांनी केले, तर आभार आर.व्ही. छल्लारे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. गणेश खटके, प्रा. विठ्ठल चव्हाण, रमेश दोंदल, अप्पासाहेब चव्हाण यांनी परिश्रम घेतले.

विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे -पुनवटकर

मुख्याध्यापक जे.आर. पुनवटकर म्हणाले की, विद्यार्थ्यांनी शिकताना अभ्यासावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. एक ध्येय ठेवून काम करावे. पायाभूत विषयांची चांगली तयारी करा. यातून आपल्याला आयुष्यात यश मिळून मोठ्या पदावर जाता येते. तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालायला पाहिजे. मुलींना त्रास देणाऱ्यावर पोकसा कायद्याअंतर्गत कारवाई होते, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: The need to get the youth out of the yoke of addiction - Ballal