शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

भुजबळांचे कट्टर विरोधक खासदार भास्कर भगरे अंतरवाली सराटीत, जरांगेंची भेट घेत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2024 14:34 IST

राष्ट्रवादी कॉँग्रेस शरद पवार पक्षाचे खासदार भगरे यांनी मनोज जरांगे यांची अचानक घेतलेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

- पवन पवार 

वडीगोद्री ( जालना) : दिंडोरी लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार भास्कर भगरे यांनी शुक्रवार सकाळी अंतरवाली सराटीत येऊन  मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली. दोघांमध्ये तासभर चर्चा झाली. त्यानंतर खासदार भगरे यांनी प्रसार माध्यमांसोबत संवाद साधला. मराठा समाजामध्ये अनेक गरीब कुटुंब आहेत, त्यांचा विकास झालेला नाही. यामुळे मराठा आरक्षण मिळाले पाहिजे अशी भूमिका राष्ट्रवादी कॉँग्रेस शरद पवार पक्षाची आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेस पक्ष आणि मी सहमत आहे असे भास्कर भगरे म्हणाले.

खासदार भगरे पुढे म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून जे आंदोलन सुरू आहे त्यास पाठिंबा देण्यासाठी आलो. शरद पवारांची भूमिका मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशीच आहे. लोक काय अर्थ काढता यापेक्षा मराठा समाजाला आरक्षण मिळाव ही पक्षाची भूमिका आहे. तीच भूमिका माझी राहणार आहे असे खासदार भगरे म्हणाले. 

भुजबळांचे कट्टर विरोधक म्हणून भास्कर भगरे यांची ओळख आहे. उद्या 20 जुलै पासून मनोज जरांगे पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसणार आहेत. त्या अनुषंगाने आज खासदार भगरे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेस शरद पवार पक्षाचे खासदार भगरे यांनी मनोज जरांगे यांची अचानक घेतलेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलJalanaजालना