शेलगाव, दावलवाडी येथील सदस्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:06 IST2021-02-05T08:06:38+5:302021-02-05T08:06:38+5:30

भारज येथील युवकांची सैन्यदलात निवड भारज : भारज बुद्रुक येथील अमोल पंडित बोडखे, प्रमोद फुसे या दोन युवकांची भारतीय ...

Members felicitated at Shelgaon, Davalwadi | शेलगाव, दावलवाडी येथील सदस्यांचा सत्कार

शेलगाव, दावलवाडी येथील सदस्यांचा सत्कार

भारज येथील युवकांची सैन्यदलात निवड

भारज : भारज बुद्रुक येथील अमोल पंडित बोडखे, प्रमोद फुसे या दोन युवकांची भारतीय सैन्य दलात निवड झाली आहे. या दोघांच्या निवडीचे पंचायत समिती सदस्य नाना बोडखे, सरपंच तुळशीराम पायघन, पोलीस पाटील संजय तेलंग्रे, शंकर डब्बे, उमेश रहेकवार, रामचंद्र तेलंग्रे, विठ्ठल सोनुरे यांच्यासह ग्रामस्थांनी स्वागत केले.

शहरातील नवीन पुलाचे काम संथगतीने

जालना : शहरातील ब्रिटिशकालीन लोखंडी पूल पाडून नवीन पुलाचे बांधकाम केले जात आहे, परंतु हे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. परिणामी, वाहतुकीसाठी असलेल्या दुसऱ्या पुलावर वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. त्यामुळे या पुलाचे काम त्वरित पूर्ण करून मार्ग वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी शहरावासीयांमधून केली जात आहे.

जाफराबादेत मराठी भाषा पंधरवाडा कार्यक्रम

जाफराबाद : येथील दिवाणी न्यायालयाच्या वतीने रविवारी मराठीभाषा पंधरवाडा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी न्यायाधीश अरुण व्यवहारे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास प्रा.डॉ.र.तु. देशमुख, ॲड.विष्णू शिंदे, सचिव ॲड.सादीक शेख, ॲड.विष्णूवर्धन शिंदे, ॲड.वर्षा देशपांडे आदींची उपस्थिती होती.

अवैध प्रवासी वाहतूक; कारवाईची मागणी

अंबड : ग्रामीण भागात अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था आणि वाढलेले अपघात पाहता, प्रशासनाने अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Members felicitated at Shelgaon, Davalwadi