शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचा मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:26 IST

: राज्यमंत्री अब्दुल सत्तार जालना : राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार अत्यंत चांगले ...

: राज्यमंत्री अब्दुल सत्तार

जालना : राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार अत्यंत चांगले काम करत असून, याचा धसका विरोधकांनी घेतला असल्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी नमूद केले. आगामी सर्व निवडणुकांमध्ये शिवसेना आघाडीवर राहील या दृष्टीने प्रयत्न करून, शिवसैनिकांनी सज्ज राहण्याचे आवाहन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.

मंगळवारी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात शिवसेना-युवासेना कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे, जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, माजी आ. संतोष सांबरे, युवासेनेचे राज्यविस्तारक अभिमन्यू खोतकर, जिल्हा युवा अधिकारी भाऊसाहेब घुगे, माजी जिल्हाप्रमुख बाबासाहेब इंगळे, भाऊसाहेब पाऊलबुद्ध, पंडित भुतेकर, शहरप्रमुख विष्णू पाचपुले, दलित आघाडीचे जिल्हाप्रमुख अ‍ॅड. भास्कर मगरे, आत्मानंद भक्त, महिला आघाडीच्या संघटक सविता किवंडे, आदींची उपस्थिती होती.

यावेळी सत्तार यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंवरही त्यांच्या खास शैलीत टीका केली. आता पुढील सर्व निवडणुकांसाठी शिवसैनिक, युवा सैनिकांनी सज्ज होऊन सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आपल्या

ताब्यात आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे ते म्हणाले.

यावेळी माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर म्हणाले की, जालना जिल्हा आणि शहर हा पूर्वीपासूनच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. आता तर आपल्याच पक्षाचे प्रमुख मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी शिवसैनिकांनी जनतेत जाऊत त्यांचा प्रचार व प्रसार करणे गरजेचे आहे.

तसेच यावेळी ज्योती ठाकरे यांनीदेखील सविस्तर विचार व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी शहरप्रमुख बाला परदेशी यांनी केले. कार्यक्रमास शिवसैनिकांची माेठी उपस्थिती होती.

चौकट

पंतप्रधानही मोराला दाणेच टाकत होते : अंबेकर

शिवसेनेच्या मेळाव्यात बोलताना जिल्हा प्रमुख भास्कर अंबकेर यांनी सांगितले की, तत्कालीन सरकारने जी कर्जमाफी दिली होती, ती फसवी होती. दीड लाख रुपये मिळावे म्हणून शेतकऱ्यांना बँकांमध्ये खेटे घालावे लागले. तसेच अनेक कागदपत्रांची पूर्तता करताना नाकीनऊ येत होते. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जी कर्जमाफी दिली आहे, ती सरसकट असून, दोन लाख रुपये तातडीने माफ झाले आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर ते घरात बसून असल्याचा आरोप भाजपकडून केला जात होता; परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील कोरोना काळात घराबाहेर पडले नाहीत. त्यांनी मोराला दाणे टाकण्यात धन्यता मानल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर यांनी करून भाजपवर निशाणा साधला.