शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

‘लाइट ऑफ लाइफ ट्रस्टचा’ बालकला महोत्सव ऑनलाइन ‘लाइट ऑफ लाइफ ट्रस्टचा’ बालकला महोत्सव आॅनलाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:58 IST

जालना : मुलींनी स्वत:च्या पायावर उभे राहिल्याशिवाय लग्न करू नये, कुटुंबीयांना विश्वासात घेऊन आपले करिअर घडविण्यासाठी प्रयत्न करावे. तुम्ही ...

जालना : मुलींनी स्वत:च्या पायावर उभे राहिल्याशिवाय लग्न करू नये, कुटुंबीयांना विश्वासात घेऊन आपले करिअर घडविण्यासाठी प्रयत्न करावे. तुम्ही ठरविले तर काहीपण करू शकता, तुमच्यामध्ये तेवढी क्षमता आहे, ती ओळखणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन इनरव्हील क्लबच्या डॉ. सोनाली जेथलिया यांनी विद्यार्थ्यांना संबोधताना केले. त्या ‘लाइट ऑफ लाइफ ट्रस्ट’ आयोजित बालकला महोत्सवप्रसंगी बोलत होत्या.

लाइट ऑफ लाइफ ट्रस्टच्या वतीने रविवारी बालकला महोत्सव घेण्यात आला. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी लाइट ऑफ लाइफ ट्रस्टचा यंदाचा बालकला महोत्सव ऑनलाइन पार पडला. यावेळी अध्यक्षस्थानी प्रकल्प अधिकारी जोमा मस्ती, प्रमुख पाहुणे म्हणून इनरव्हील क्लबच्या डॉ. सोनाली जेथलिया, रश्मी गिनदोंडीया, सुभाष क्षीरसागर, गोविंद खुळखुळे, कृष्णा वराडे, कौशल्या खरात, कैलास कोल्हे, दीपक काळदाते, समर्थ डोंगरे, सचिन सपकाळ, असेफ कुरैशी, शिवाजी काजळकर, जितेंद्र खिल्लारे, राहुल सोनावने, संध्या बोरुडे यांची उपस्थिती होती.

जग कोरोनासारख्या महामारीशी सामना करत असतानादेखील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करून छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. जालना जिल्ह्यातील वेगवेळ्या केंद्रांमधून विद्यार्थी व पालक गुगल मिटद्वारे ऑनलाइन सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, गायन स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, भाषण स्पर्धा, एकल नृत्य, समूह नृत्य या स्पर्धांमध्ये विशेष प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले.