शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

जालना जिल्ह्यातील २५ औषध दुकानांचे परवाने निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 00:57 IST

एप्रिल ते आॅक्टोबर या कालावधीत नियमांचे उल्लंघन करणा-या २५ दुकानदारांचा परवाना काही कालावधीसाठी निलंबित करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : नियमांचे उल्लंघन करून औषधांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर औषध प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. एप्रिल ते आॅक्टोबर या कालावधीत नियमांचे उल्लंघन करणा-या २५ दुकानदारांचा परवाना काही कालावधीसाठी निलंबित करण्यात आला आहे. तर ४५ जणांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली असून, एका व्यावसायिकाचा परवाना रद्द करण्यात आला आहे.सर्वसामान्यांसाठी आरोग्य सेवा ही महत्त्वाची आहे. आजारी व्यक्तीला देण्यात येणारी औषधे विक्रीबाबत औषध प्रशासनाने व्यवसायिकांना नियम घालून दिले आहेत. औषधी व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० व त्या अंतर्गत नियमानुसार औषधांची विक्री करावी, याबाबत वेळोवेळी औषध प्रशासनाच्या वतीने सूचना दिल्या जातात. शिवाय औषध प्रशासनातील अधिकारी नियमित शहरी, ग्रामीण भागातील औषध विक्री करणा-या दुकानांची तपासणी करतात. या तपासणीत औषध विक्रीच्या नोंदी न ठेवणे, बिले न ठेवणे, फार्मासिस्टच्या अनुपस्थितीत औषधांची विक्री करणे, डॉक्टरांची चिठ्ठी नसताना औषधांची विक्री करणे आदी नियमांचे उल्लंघन होत असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. औषध प्रशासनाच्या सहायक आयुक्त अंजली मिटकर व त्यांच्या टीमने जिल्ह्यातील औषध विक्री करणा-या दुकानांची एप्रिल ते आॅक्टोबर या कालावधीत तपासणी केली. यात जालना, घनसावंगी, अंबड, मंठा, बदनापूरसह ग्रामीण भागातील विक्रेत्यांनी वरील नियमांचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे. नियमांचे उल्लंघन करणा-या २५ व्यवसायिकांचे परवाने काही कालावधीसाठी निलंबित करण्यात आले होते. निलंबन कालावधीत औषधांची विक्री न करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. यातील काही दुकानदरांच्या कारवाईचा कालावधी पूर्ण झाल्याने परवाना पूर्ववत करण्यात आले आहेत. याच दरम्यान ४५ व्यवसायिकांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती. संबंधितांचा खुलासा आल्यानंतर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

टॅग्स :Medicalवैद्यकीयmedicinesऔषधंHealthआरोग्य