कडवंची येथून ४०० किलो द्राक्ष चोरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:38 AM2021-02-25T04:38:35+5:302021-02-25T04:38:35+5:30

तलावात उत्खनन केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा जालना : बदनापूर तालुक्यातील डोणगाव शिवारातील तलावात जेसीबीच्या साहाय्याने विनापरवाना उत्खनन केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध चंदनझिरा ...

Kadwanchi stole 400 kg of grapes from here | कडवंची येथून ४०० किलो द्राक्ष चोरले

कडवंची येथून ४०० किलो द्राक्ष चोरले

Next

तलावात उत्खनन केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा

जालना : बदनापूर तालुक्यातील डोणगाव शिवारातील तलावात जेसीबीच्या साहाय्याने विनापरवाना उत्खनन केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कृष्णा प्रभाकर सरोदे (२२, रा. नळणी, ता. भोकरदन), साहेबराव गंभीर नागवे (३८ रा. खामखेडा, ता. भोकरदन), जेसीबीचालक नायब गंभीरराव नागवे (रा. खामखेडा, ता. भोकरदन), गणेश बोडखे (रा. आसरखेडा, ता. बदनापूर) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. पुढील तपास चव्हाण हे करीत आहेत.

कारची दुचाकीला धडक; दोघे गंभीर जखमी

जालना : कारने दुचाकीला धडक दिल्याची घटना बदनापूर शहरातील इल्हाडी रस्त्यावर सोमवारी घडली. या अपघातात विठ्ठल गणपत गाडेकर (३५) व विनायक सांडू गाडेकर (वय ३६, दोघे रा. भातखेडा, ता. बदनापूर) हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. या प्रकरणी सुभाष दादाराव गाडेकर यांच्या फिर्यादीवरून कारचालकाविरुद्ध बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पो.हे.कॉ. बुनगे हे करीत आहेत.

एका कार्यालयात चोरी

जालना : शहरातील भोकरदन नाका परिसरात असलेल्या एका खासगी कार्यालयात चोरट्यांनी चॅनल गेटसह कॅबिनचे कुलूप तोडून धाडसी चोरी केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. चोरट्यांनी कॅबिनमधील सॅमसंग कंपनीचा अकरा हजार रुपये किमतीचा एलसीडी टीव्ही चोरून नेला आहे. या प्रकरणी मधुकर मुळे यांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

तौर यास चार दिवसांची पोलीस कोठडी

जालना : शहरातील नूतन वसाहत भागात जून २०२०मध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली होती. या गुन्ह्यातील मुख्य संशयित आरोपी गजानन तौर हा मागील आठ महिन्यांपासून फरार होता. मंगळवारी तौर हा कदीम पोलीस ठाण्यात येऊन हजर झाला आहे. त्यास बुधवारी न्यायालयात हजर केले असता, चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक महाजन यांनी दिली.

Web Title: Kadwanchi stole 400 kg of grapes from here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.