शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
2
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
3
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
4
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
5
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
6
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
7
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
8
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
9
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
10
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
11
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
12
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
13
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
14
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
15
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
16
नव्या आर्थिक वर्षात टाटा मोठा धमाका करणार! लवकरच ६ नव्या 'ढासू' कार बाजारात आणणार; बघा संपूर्ण प्लॅन
17
हॉटेलची रूम दिसते चकाचक, पण टॉयलेट सीटपेक्षा घाणेरड्या असतात 'या' गोष्टी; वापरताना सावधान
18
महिलांना दरमहा ३००० रुपये, मोफत बस प्रवास अन्...! सुवेंदू सरकार ॲक्शन मोडवर, १ जूनपासून खात्यात जमा होणार पैसे
19
"रस्त्यावर नमाज पठण चालणार नाही, प्रेमाने सांगून ऐकलं नाही तर..."; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा इशारा 
20
IPL 2026 सुरू असताना धोनी अचानक NSG कॅम्पमध्ये; कमांडोंसोबत केला नेमबाजीचा सराव (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा पराभवातून उभारी, कैलास गोरंट्याल यांचे जालन्यावर पुन्हा वर्चस्व सिद्ध, मनपावर कमळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 20:22 IST

जालनेकरांचा 'विश्वास' कमळाच्या सोबतीला! पहिल्याच महानगरपालिकेत भाजपने रचला विजयाचा इतिहास.

- विजय मुंडे
जालना :
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपात दाखल झालेले माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी महानगरपालिकेचा गड राखण्यात यश मिळविले आहे. शुक्रवारी झालेल्या मतमोजणीत भाजपने ४१ जागांसह बहुमतात महापालिकेवर सत्ता मिळविली आहे. या निवडणुकीत शिंदेसेना बॅकफूटवर गेली असून, दोन्ही राष्ट्रवादीचा सुपडासाफ झाला आहे.

महानगरपालिकेची ही पहिलीच निवडणूक झाली. या निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर महायुती व्हावी यासाठी भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादीच्या (अजित पवार) नेत्यांच्या बैठकांवर बैठका झाल्या होत्या. परंतु, ऐन उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी स्वतंत्र निवडणुका लढविण्याचा निर्णय झाला, तर महायुतीची मोट कायम होती. भाजपकडून माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, आमदार बबनराव लोणीकर, माजी आमदार कैलास गोरंट्याल, महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे यांनी सूत्रे हलविली. शिंदेसेनेकडून आमदार अर्जुन खोतकर यांनी सूत्रे हाती घेतली होती. महाविकास आघाडीची धुरा खासदार डॉ. कल्याण काळे यांच्या खांद्यावर होती. जालना महानगरपालिकेच्या १६ प्रभागांतील ६५ जागांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान झाले. त्यात ६१.१६ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. तर शुक्रवारी (दि.१६) सकाळी मतमोजणीस प्रारंभ झाला. भाजपने अखेरपर्यंत आघाडी कायम राखत ४१ जागांवर विजय मिळविला, तर शिंदेसेनेला १२ जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेसला नऊ, एमआयएमला दोन आणि एक अपक्ष उमेदवार विजयी झाला.

गोरंट्याल यांच्यामुळे मिळाले बळ
काँग्रेस पक्षाचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्यासोबत त्यांचे सहकारीही भाजपात आले होते. त्यामुळे भाजपची शहरातील ताकद वाढली होती. परिणामी गत नगरपालिका निवडणुकीत ११ असलेले भाजपचे संख्याबळ आता महानगरपालिकेत थेट ४१ वर आणि तेही बहुमतात आले आहे.

भाजपचे बळ वाढले
विधानसभा निवडणुकीत भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले होते. तर शिंदेसेनेचे दोन उमेदवार विजयी झाले होते. या निवडणुकीनंतर काँग्रेसचे नेते कैलास गोरंट्याल भाजपात दाखल झाले. परिणामी मनपा निवडणुकीत प्रथमच भाजपाला सत्ता मिळाली.

दोन्ही राष्ट्रवादी बाहेर
जालना नगरपालिकेत राष्ट्रवादीचे नऊ उमेदवार होते. पक्ष फुटीनंतर झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादीने निवडणुकीत उमेदवार उभे केले होते. परंतु, त्यांचा एकही उमेदवार विजयी झाला नाही.
मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. तर शुक्रवारी (दि.१६) सकाळी मतमोजणीस प्रारंभ झाला. भाजपने अखेरपर्यंत आघाडी कायम राखत ४१ जागांवर विजय मिळविला, तर शिंदेसेनेला १२ जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेसला नऊ, एमआयएमला दोन आणि एक अपक्ष उमेदवार विजयी झाला.

English
हिंदी सारांश
Web Title : Kailas Gorantyal Reclaims Jalna: BJP Dominates Municipal Elections After Assembly Loss

Web Summary : Kailas Gorantyal's BJP secured a majority in Jalna Municipal Corporation with 41 seats, overcoming previous assembly defeat. The election saw setbacks for Shiv Sena (Shinde faction) and a complete washout for both NCP factions. Congress secured nine seats. Gorantyal's inclusion boosted BJP's strength.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Jalna Municipal Corporation Electionजालना महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६