शहरं
Join us  
Trending Stories
1
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
2
Vladimir Putin to Visit China: ट्रम्प यांच्यानंतर पुतिन चीनला भेट देणार! शी जिनपिंग यांच्यासोबत 'या' मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा
3
Twisha Sharma : "दीदी, या मला २४ तास कंट्रोल करतात"; मृत्यूच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वी ट्विशाने पाठवला होता मेसेज!
4
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल
5
१ जूनपासून महिलांच्या खात्यावर येणार ३ हजार ; प. बंगालच्या नव्या सरकारचा आश्वासनपूर्तीचा धडाका
6
अमेरिकेत मशिदीत अंधाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
7
मोटेगावकरने स्वतःच्या मुलासाठीच फाेडला पेपर? नऊ दिवसांची कोठडी, सीबीआयचा दावा; हस्तलिखित नोट्सच्या माध्यमातून पुरवले प्रश्न व उत्तरे
8
एक हजारावर विद्यार्थ्यांकडून पेपर खरेदी; ‘सीबीआय’ला संशय : नागपूरमधील ‘आलोक’ आता रडारवर
9
साखरपुड्याला जाण्यासाठी ट्रकमध्ये बसले ६० जण; कंटेनरची धडक, १३ ठार
10
सीबीआय पथक लातूर शहरात ठाण मांडून; कोचिंग क्लासेस परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात  
11
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी रणसंग्राम; १८ जूनला निवडणूक होणार
12
वंदना सूर्यवंशी यांची विभागीय चौकशी प्रारंभ, मुंबई मुद्रांक जिल्हाधिकारी असताना ४९.३१ कोटींचे शासनाचे केले हाेते नुकसान
13
एसटी प्रवास महागणार, डिझेल दरवाढीचा प्रवाशांना माेठा फटका
14
एक डॉलर ९६.३५ रुपयांना...! खिसा सांभाळून ठेवा, महागाई पाेहाेचणार उच्चांकावर
15
बाजारात ट्रम्प यांचा ‘शेअर खेळ’, तीन महिन्यांत ३,७०० शेअर व्यवहार
16
संपादकीय: या कॅन्सरला ‘नीट’ रोखा, तीन दशकांत अक्षरशः खोबरे झाले
17
भारत-पाकमधून वाहणाऱ्या नद्यांचे पाणी कुणाचे? 
18
राजनैतिक थकव्याने एकाकी इराणला भारताचा(च) आधार!
19
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
20
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
Daily Top 2Weekly Top 5

पावसात झाडाखाली थांबले अन् तिथेच काळाने गाठलं; दोन मित्रांचा वीज पडून मृत्यू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 21:34 IST

अंबड तालुक्यातील महाकाळा गावावर शोककळा; अवकाळी पावसात वीज पडून दोन मित्रांचा दुर्दैवी अंत.

वडीगोद्री (जि. जालना): अंबड तालुक्यातील महाकाळा येथील तीन मित्र दर सोमवारप्रमाणे आपेगाव येथील श्री विज्ञानेश्वर दर्शनासाठी दुचाकीवर निघाले होते. मात्र, वाटेत आलेल्या अवकाळी पावसाने त्यांच्यावर काळाचा घाला घातला. पावसापासून वाचण्यासाठी नाथनगर वस्तीजवळ एका लिंबाच्या झाडाखाली थांबले असता, त्याच झाडावर वीज कोसळली. या भीषण दुर्घटनेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली.
या दुर्दैवी घटनेमुळे महाकाळा गावावर शोककळा पसरली असून, संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

झाडाखालचा आसरा ठरला जीवघेणा
गोविंद प्रल्हाद लहाने (वय २१) आणि आदित्य दगडू बेद्रे (वय २०, दोन्ही रा. महाकाळा, ता. अंबड) अशी मृत पावलेल्या तरुणांची नावे आहेत. त्यांच्यासोबत असलेला समर्थ भगवान वाघमारे हा तरुण वीज पडल्याने गंभीररीत्या भाजला असून, त्याला तातडीने खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. महाकाळा ते साष्ट पिंपळगाव रोडवरील नाथनगर वस्तीजवळ हे तिघेही पावसापासून वाचण्यासाठी लिंबाच्या झाडाखाली थांबले होते, त्याच वेळी ही निसर्गाची वीज त्यांच्या अंगावर कोसळली.

विज्ञानेश्वराचे दर्शन राहिले अधुरे
हे तिन्ही तरुण दर सोमवारी श्रद्धेने आपेगावच्या विज्ञानेश्वर मंदिरात दर्शनासाठी जात असत. आजही ते त्याच भक्तीभावाने निघाले होते, मात्र नियतीला काही वेगळेच मान्य होते. पावसाने गाठल्यामुळे त्यांनी दुचाकी थांबवून झाडाचा आधार घेतला, पण तोच आधार त्यांच्यासाठी शेवटचा ठरला. या तरुणांचे विज्ञानेश्वराचे दर्शन घेण्याचे स्वप्न अधुरेच राहिले, अशी भावना ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.

पोलिसांकडून पंचनामा आणि मदतकार्य
घटनेची माहिती मिळताच गोंदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांच्या मदतीने दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी शहागड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आले आहेत. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून, गंभीर जखमी तरुणावर उपचार सुरू आहेत. अवकाळी पावसाने जालन्यात पुन्हा एकदा बळी घेतल्याने शेतकरी आणि सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Lightning strike kills two friends sheltering under tree during rain.

Web Summary : Two friends died in Jalna after lightning struck a tree they sheltered under during unseasonal rain. A third friend is critically injured. They were on their way to a temple.
टॅग्स :RainपाऊसJalanaजालनाDeathमृत्यू